Company Gifts Cars To Employees: नोकरकपातीच्या लाटेदरम्यान `या` कंपनीने कर्मचाऱ्यांना Gift केल्या Luxury Cars; कारण...
IT Firm Gifts Cars To Employees: एकीकडे कर्मचारीकपातीच्या बातम्या समोर येत असतानाच दुसरीकडे या कंपनीने आपल्या 13 कर्मचाऱ्यांना लक्झरी गाड्या भेट दिल्या असून या अनोख्या बक्षीसामुळे कंपनीची सध्या आयटी सेक्टरमध्ये जोरदार चर्चा आहे.
IT Firm Gifts Cars To Employees: एकीकडे फेसबुकची पालक कंपनी असलेली मेटा (Meta), अॅमेझॉन (Amazon), गुगल (Google) सारख्या दिग्गज टेक कंपन्या कर्मचारीकपात (Layoffs) करत आहेत. तर दुसरीकडे भारतामधील एक आयटी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून चक्क कार देत आहेत. तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही पण ही बातमी खरी आहे. कर्मचाऱ्यांना लक्झरी कार्स गिफ्ट करणारी कंपनी भारतीय आहे. 'त्रिध्या टेक' (Tridhya Tech) असं या कंपनीचं नाव असून ती अहमदाबादमध्ये (Ahmedabad, Gujarat) आहे. कंपनीने आपल्या 13 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कार भेट देण्यात आल्या आहेत.
काय करते ही कंपनी?
आयटी कंपनी 'त्रिध्या टेक'ने नुकताच आपला पाचवा स्थापना दिवस साजरा केला. कंपनीचे एमडी रमेश मारांड यांनी याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना, कंपनीने पाच वर्षांमध्ये जी झेप घेतली आहे त्यामागे कर्मचाऱ्यांची कठोर मेहनत आहे असं म्हटलं. कंपनीने मिळवलेला नफा कर्मचाऱ्यांबरोबर वाटला पाहिजे अशी कंपनीची भूमिका असल्याचं मारंड मारांड यांनी सांगितलं. त्रिध्या टेक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसंदर्भातील सेवा पुरवते.
कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय?
कंपनीला पाच वर्ष पूर्ण झाली असून कंपनीच्या कामगिरीवर संस्थापक आणि मॅनेजमेंट समाधानी आहे. मेहनतीचं कौतुक होतं तेव्हा लोक फार सामाधानी असतात. त्याही कंपनी आपल्या नफ्यातील काही भाग कर्मचाऱ्यांमध्ये वाटते तेव्हा कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत होतो. तसे त्यांना अधिक मेहनत करण्याची प्रेरणाही मिळते. कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीसोबत असलेल्या ध्रुव पटेलने, आम्ही कंपनीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आमचं कौतुक करताना कंपनीच्या मॅनेजमेंटने कधीच हात आखडता घेतलेला नाही. सामान्यपणे आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी जास्त पगार मिळाल्यास 1-2 वर्षांमध्ये नोकरी बदलतात. मात्र त्रिध्या टेकमध्ये मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळाल्याचं ते सांगतात.
यापूर्वी गाड्या आणि घरंही देण्यात आली
कंपनीबरोबर दिर्घकाळ काम करताना कंपनीच्या यशामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या 13 जणांना कार भेट म्हणून देण्यात आल्या. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीगुजरातमधील हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कार भेट म्हणून दिली होती. यापूर्वीही अनेक कंपन्यांनी अगदी घरांपासून, कार्सपासून ते घरातील मोठ्या आकाराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी भेट म्हणून दिल्याची उदाहरण आहेत. मात्र एकीकडे मंदीची चर्चा सुरु असतानाच कर्मचारीकपातीच्या बातम्यांदरम्यान कर्मचाऱ्यांच्या कामाचं कार देऊन कौतुक करणारी गुजरातमधील ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.