नवी दिल्ली : भारती एयरटेलने आपल्या 4जी हॉटस्पॉटची किंमत कमी केली आहे.


4जी हॉटस्पॉटची किंमत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता  4जी हॉटस्पॉट उपकरण ९९९ रूपयांना उपलब्ध होईल. हे हॉटस्पॉट अॅमेझॉन इंडियावर ऑनलाईन उपलब्ध आहे.  यासाठी  एयरटेलचे 4जी सीम घेणे गरजेचे आहे. यात तुम्ही पोस्टपेड किंवा प्रीपेड प्लॅन घेऊ शकतात.


हाय स्पीड वायफाय सेवा


ग्राहकांना हाय स्पीड वायफाय सेवा देण्याचा कंपनीचा मानस आहे. यामुळे तुम्ही कोठेही गेलात तर तुमच्यासोबत हाय स्पीड वायफाय असेल. यामध्ये एकावेळी तुम्ही अनेक उपकरण कनेक्ट करू शकता. 
त्याचबरोबर हॉटस्पॉट देशातील सर्व एयरटेल रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध आहेत. एयरटेल देशातील २२ दूरसंचार भागात 4जी सेवा देते.