मुंबई : देशभरात महागाईने सामान्य जनता होरपळली असताना आता टेलिकॉंम कंपन्यांनी मोबाईल प्लान्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाने सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहक या कंपन्यांकडे दर न वाढविण्याची मागणी करतायत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिकॉम कंपनी एअरटेल येत्या काही दिवसांत आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवणार आहे. या वृत्ताला कंपनीचे सीईओ गोपाल विट्टल यांनी दुजोरा दिलाय. प्रीपेड प्लॅनच्या किंमती कधी वाढवल्या जातील याची कोणतीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी ती केली जाणार आहे.


एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल म्हणाले की, प्रीपेड प्लॅनच्या किमती यावर्षी वाढवल्या जातील. त्यांचे म्हणणे आहे की किंमत निश्चितपणे वाढवली जाईल जेणेकरून कंपनीचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 200 रुपये ठेवता येईल. गोपाल विठ्ठल यांना विश्वास आहे की किंमत वाढवूनही प्रीपेड प्लॅनची किंमत खूपच कमी होईल.


दरम्यान एअरटेल कंपनी आता किती दरवाढ करतेय ?  ही दरवाढ सामान्य जनतेला परवडणार का हे पहावे लागेल.