या कंपनीचा ग्राहकांना झटका, इंटरनेट डेटामध्ये कपात
देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना झटका दिला आहे.
नवी दिल्ली : देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना झटका दिला आहे. एअरटेलनं त्यांच्या १४९ आणि ३९९ रुपयांच्या प्लानच्या इंटरनेट डेटामध्ये कपात केली आहे. एअरटेलच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये आता २८ दिवसांसाठी १ जीबी डेटा प्रत्येक दिवशी देण्यात येणार आहे. तर ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी १.४ जीबी डेटा प्रत्येक दिवशी देण्यात येईल. अनलिमिटेड कॉल आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा अजूनही कायम आहे.
एअरटेलनं डेटामध्ये कपात केल्याचा फायदा रिलायन्स जिओ आणि वोडाफोनला होऊ शकतो. जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ४.५ जीबी डेटा प्रत्येक दिवशी मिळत आहे. याआधी जिओ ग्राहकांना ३ जीबी डेटा मिळत होता. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. याचबरोबर अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल कॉल तसंच १०० एसएमएसही फ्री मिळत आहेत.
वोडाफोनच्या ३९९ रुपयांच्या वोडाफोन रेड बेसिक प्लानमध्ये ३९९ रुपयांमध्ये ४० जीबी डेटा मिळणार आहे. याआधी याच प्लानमध्ये २० जीबी डेटा मिळत होता. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री रोमिंगची सुविधा मिळत आहे. तसंच दिवसाला १०० एसएमएसही फ्री आहेत. याचबरोबर ग्राहकांना वोडाफोन प्ले आणि अॅमेझॉन प्राईमची वर्षाचं फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे.