मुंबई : एअरटेलनं मुंबईमध्ये 4G VoLTE सर्व्हिसला सुरुवात केली आहे. मुंबईनंतर पुढच्या काही महिन्यांमध्ये ही सेवा देशभरात उपलब्ध करून देण्याचा एअरटेलचा विचार आहे. एअरटेल VoLTE 4G वर काम करंत, यामुळे ग्राहकांना जलद कॉल कनेक्ट करता येईल तसंच एचडी व्हॉईस क्वॉलीटीचा व्हॉईस कॉल करता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

VoLTE म्हणजे Voice over Long Term Evolution. यामुळे ग्राहकांना फोनवर बोलताना एचडी क्लियर क्रिस्टल व्हॉईस मिळेल. नेहमी फोनवर बोलताना येणाऱ्या आवाजाच्या तुलनेत ग्राहकाला चांगल्या प्रतीच्या आवाजाचा अनुभव मिळेल.


4G VoLTE सेवेसाठी एअरटेल ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेणार नाही. तसंच ग्राहकांना कोणतंही विशेष टॉकटाईमचं रिचार्जही करावं लागणार नाही. 4G VoLTE कॉल्स हे डेटाचा वापर करणार आहे. असं असलं तरी ग्राहकांच्या डेटा पॅकमधून हा डेटा वापरला जाणार नाही. सध्याच्या व्हॉईस प्लॅननुसार एअरटेल वीएलएलटीई कॉलचं शुल्क आकारलं जाईल.


एअरटेलच्या 4G VoLTE सर्व्हिस कशी अॅक्टिव्हेट कराल?


एअरटेल 4G VoLTE सर्व्हिस अॅक्टिव्हेट करण्यासाठी ग्राहकाकडे 4G सीमकार्ड असणं आवश्यक आहे. मोबाईलच्या सेटींगमध्ये जाऊन ग्राहकांना ही सर्व्हिस अॅक्टिव्हेट करावी लागणार आहे.


Settings> Mobile Data>Mobile Data Options> Enable 4G >Voice & Data to activate Airtel 4G VoLTE ला ऑन करावं लागणार आहे.


4G VoLTE सेवा अॅक्टिव्हेट करता आली नाही तर ग्राहकांनी 121 या हेल्पलाईनवर कॉल करावा. फोनवर एअरटेल VoLTE सर्व्हिस सुरु झाली तर मोबाईलवर नेटवर्क दिसतं तिकडे 'HD / VoLTE' चा आयकॉन दिसेल.


या स्मार्टफोनवर मिळणार 4G VoLTE सर्व्हिस


ऍपल आयफोन 7, 7 प्लस, 6, आयफोन 6 एस, 6 एस प्लस आणि आयफोन एसई, सॅमसंग जे 7, जे 2, ए 8, शाओमी एमआय मिक्स, रेडमी नोट 4, एमआय 5, Oppo F3 आणि Gionee A1 स्मार्टफोनवर 4G VoLTE सर्व्हिस उपलब्ध आहे. लवकरच दुसऱ्या स्मार्टफोनवरही ही सर्व्हिस सुरु होईल, अशी प्रतिक्रिया एअरटेलनं दिली आहे.