मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड टेरिफ प्लानमध्ये अनेक बदल केले आहेत. आता नव्या प्लानच्या माध्यमातून एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओला टक्कर देणार आहे. एअरटेलने लॉन्च केलेला हा प्लान 558 रुपयांचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्लान अंतर्गत ग्राहकांना प्रति दिन 3GB इंटरनेट डेटा मिळणार असून याची वैधता 82 दिवसांची असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 558 रुपयांत एकूण 246 GB डेटा मिळणार आहे. 


एअरटेलच्या या नव्या पॅकमध्ये लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड वॉईस कॉलिंग तसेच प्रति दिन 100 SMS मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या 509 रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना प्रति दिन 4GB 4G डेटा मिळतो. मात्र, याची वैधता केवळ 28 दिवसांचीच आहे.


वोडाफोननेही आपल्या ग्राहकांसाठी अशाच प्रकारचा प्लान लॉन्च केला आहे ज्याची किंमत 569 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना प्रति दिन 3GB डेटा मिळतो आणि त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग तसेच प्रति दिन केवळ 250 फ्री मिनिट्स मिळतात.


दरम्यान, एअरटेलने नुकताच आपला एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची किंमत 149 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना प्रति दिन 2GB डेटा मिळतो म्हणेजच 149 रुपयांत ग्राहकांना एकूण 56GB डेटा मिळतो.