नवी दिल्ली : देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी एअरटेलने नववर्षापूर्वी एक जबरदस्त आणि स्वस्त असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.


माझा पहिला स्मार्टफोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलने लॉन्च केलेल्या सेल्कॉन स्टार ४जी प्लस या फोनची किंमत केवळ १२४९ रुपये आहे. हा फोन 'माझा पहिला स्मार्टफोन' या योजनेअंतर्गत सादर केला आहे.


बजेट फोन


या फोनची किंमत २९९९ रुपये आहे मात्र, कंपनीच्या ऑफरमुळे हा फोन १२४९ रुपयांत मिळत आहे. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तीन वर्षांसाठी एअरटेल सबस्क्रिप्शनही करावं लागणार आहे.


काय आहे कंपनीची ऑफर?


ग्राहकांना २७४९ रुपयांचा सेल्कॉन स्टार ४जी प्लस हा स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतर ३६ महिन्यांपर्यंत तुमच्या एअरटेल नंबरवर १६९ रुपयांचं कमीत कमी रिचार्ज करावं लागणार आहे. या ऑफरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना १८ महिन्यांनंतर ५०० रुपयांचं कॅशबॅक कंपनीतर्फे देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांनी पुढील आणखीन १८ महिन्यांसाठी कमीतकमी रिचार्ज केलं तर त्यांना १००० रुपयांचं अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे. अशा प्रकारे फोनची किंमत १२४९ रुपये होणार आहे. 


काय आहेत फिचर्स...


सेल्कॉन स्टार ४जी प्लस या फोनमध्ये चार इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ड्युअल सिम फोनमध्ये १.३ गिगाहर्ट्सचं क्वाड कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे. तसेच फोनमध्ये ३.२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी १८०० एमएएच आहे.