मुंबई : रिलान्यस जिओने टेलीकॉम मार्केटमध्ये नवनव्या ऑफर्स आणल्यानंतर कंपन्यामधील स्पर्धा जबरदस्त वाढली. गेल्या काही दिवसांपूर्वी जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांनी नवनवे प्लॅन्स, ऑफर्स सादर केल्या. आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने 249  रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. त्याचबरोबर एअरटेलच्या जुन्या  349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनही अपग्रेड केला आहे. आता कंपनी 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला २८ दिवसांपर्यंत रोज 2 GB 3G/4G डेटा मिळेल.


1 GB डेटा अधिक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

349 रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना २८ दिवसांपर्यंत 3 GB डेटा मिळेल. यापूर्वी 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला रोज 2 GB डेटा मिळेल. आता कंपनीतर्फे युजर बेस मजबूत करण्यासाठी यात  1 GB डेटा अधिक देण्यात येणार आहे. 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत प्रत्येक दिवशी 100 एसएमएस ची सुविधा मिळेल.


100 एसएमएस मोफत


यापूर्वी एअरटेलने 499 रुपयांचा प्लॅन सादर केला होता. या पॅकमध्ये ग्राहकांना ८२ दिवसात 2 GB डेटा मिळेल. नव्या 249 आणि 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिडेट लोकल, एसटीडी व रोमिंग कॉलची सुविधा मिळेल. याशिवाय प्रत्येक दिवशी 100 एसएमएस मोफत मिळतील. अनलिमिडेट कॉलच्या अंतर्गत प्रत्येक दिवशी 300 मिनिटं कॉलिंग करु शकता. तर प्रत्येक आठवड्याला याची लिमिट 1,000 मिनिटं असेल. ही लिमिट संपल्यावर तुम्ही कॉल केल्यास तुम्हाला प्रति मिनिट ३० पैसे असा चार्ज लागेल.


349 रुपयांचा नवा प्लॅन


एअरटेलने 249 आणि 349 रुपयांचा नवा प्लॅनला मायएअरटेल अॅप आणि एअरटेलच्या ऑनलाईन रिचार्ज वेबसाईटवर लाईव्ह करु शकता. 249 रुपयांमध्ये दरदिवशी  2 GB 3G/4G डेटा मिळेल. या युजर्सला एकूण 56 जीबी डेटा मिळेल. तर 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दरदिवशी  3 GB प्रमाणे एकूण 84 जीबी 3G/4G डेटा मिळेल. 


299 रुपयांचा प्लॅन


Reliance Jio तर्फे 299 रुपयांमध्ये 84 GB डेटा मिळेल. 398 रुपयांमध्ये ७० दिवसात दरदिवशी 2 GB प्रमाणे  140 GB डेटा मिळेल. वोडाफोनने गेल्या काही दिवसात 299 रुपयांचा पॅक सादर केला आहे. ग्राहकांना 56 दिवसात अनलिमिडेट लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलसोबत रोज 1 GB 2G डेटा मिळेल.