नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी एअरटेलने नवे प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत. या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5चं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. अनलिमिटेड कॉलिंगशिवाय इंटरनेट डेटादेखील मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलने 289 रुपयांचा नवा प्लान जारी केला आहे. याची वैधता 28 दिवस इतकी आहे. प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. तर 28 दिवसांत एकूण 42 जीबी डेटा देण्यात येत आहे. या प्लानअंतर्गत ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मोफत मिळणार आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना ZEE5 प्रीमियम, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, हॅलो ट्यून्स, विंक म्यूजिक सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. याशिवाय शॉ अॅकॅडमीचे विनामूल्य ऑनलाइन क्लासेस देखील एका वर्षासाठी या रिचार्ज पॅकमध्ये दिले जातात. फास्टटॅगवर 150 रुपये कॅशबॅक ऑफरही देण्यात येत आहे. 


या प्लानमध्येही मिळणार ZEE5 सब्सक्रिप्शन


एअरटेल आता 79 रुपयांच्या प्रीपेड प्लानसह ZEE5 कंटेंट फ्री ऑफर करत आहे. हे सब्सक्रिप्शन 30 दिवसांसाठी असणार आहे. एअरटेल थँक्स ऍपच्या डिजिटल स्टोर सेक्शनद्वारे हा टॉप-अप सर्व एअरटेल  ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. 


...आता Instagram युजर्सला मिळणार 'ही' नवी सुविधा


ZEE5चे वाईस प्रेसिडेंट-बिजनेस डेव्हल्पमेंट आणि कमर्शियल हेड मनप्रीत बुमराह यांनी सांगितलं की, कोरोना काळात आम्ही लोकांना घरी राहण्यातं आवाहन करत आहोत. तर कंपनीकडून लोकांच्या मनोरंजनासाठी सर्व भाषा आणि डिव्हाइसेससाठी आम्ही कटेंट तयार करत असून एअरटेलच्या भागीदारीसह आम्हाला देशातील अनेक भागात पोहचता येऊ शकत असल्याचंही ते म्हणाले.