मुंबई : तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सॅमसंग आणि एअरटेलने नवा प्लॅन आणला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ऑफरनुसार काही स्मार्टफोनमध्ये घसघशीत सूट देण्यात आली आहे. तसेच ऑफरमध्ये ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या J सीरीजच्या फोनचादेखील समावेश करण्यात आला आहे.  त्यामुळे कॅशबॅक आणि मोबाईलमध्ये मिळणारी सूट एनकॅश करण्यासाठी हा प्लॅन नक्की पहा. 


कोणकोणत्या  फोनवर मिळणार ऑफर ? 


सॅमसंग गॅलेक्सी J2 (2017),  प्राइम, गॅलेक्सी J7 प्राइम आणि  गॅलेक्सी J7 प्रो यावर १५०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. हे डिस्काऊंट एअरटेल  देणार आहे. त्यामुळे सॅमसंगच्या गॅलेरीतून तुम्हांला मूळ किंमतीमध्ये मोबाईल मिळणार आहे. परंतू  एअरटेलसोबत कनेक्शन घेतल्यास त्यामध्ये १५०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.  


एअरटेलची माहिती  


एअरटेलने सॅमसंगवर मिळणारी ऑफर कन्फर्म करणार आहे. 'मेरा पहला स्मार्टफोन' या इनिशिएटीव्ह या नावाखाली ही ऑफर दिली आहे. मात्र ही ऑफर पोस्टपेड, प्रिपेड अशा कोणत्या ग्राहकांसाठी आहे ? याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिलेली  नाही.  


ऑफरच्या अटी काय ?


कॅशबॅकचा फायदा मिळवण्यासाठी वर्षभरासाठी  १९९ चा रिचार्ज करावा लागेल. 
ग्राहकांना  दोन इंस्टॉलमेंटमध्ये १५०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. पहिला ३०० रूपयांचा तर दुसरा १२०० रूपयांचा कॅशबॅक असेल. 
या ऑफरसाठी सॅमसंग  स्टोअरमधून फोन घेतल्यानंतर एअरटेलचा १९९ चा रिचार्ज करावा लागेल. १२ महिन्यांच्या रिचार्जवर ग्राहकांना २५०० रूपये खर्च करावे लागतील.  
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी १ जीबी डाटा मिळेल.