नवी दिल्ली : रिलायन्स जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये इन्ट्री करताच स्वस्त आणि मस्त टेरिफ प्लान्स लॉन्च केले. यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये डेटा आणि टेरिफ प्लान्सच्या दारात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. मात्र, जिओला टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इतरही कंपन्यांनी कंबर कसली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.


फ्री मध्ये 30 GB 4G डेटा मिळणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या प्लान अंतर्गत एअरटेलच्या युजर्सला फ्री मध्ये 30 GB 4G डेटा मिळणार आहे. म्हणजेच कंपनीतर्फे ग्राहकांना दररोज 1 GB 4G डेटा देण्यात येणार आहे.


'माझा पहिला स्मार्टफोन'


एअरटेलने आपल्या या ऑफरचं नाव 'मेरा पहला स्मार्टफोन' (माझा पहिला स्मार्टफोन) असं ठेवलं आहे. या ऑफर अंतर्गत जे ग्राहक 4G स्मार्टफोनवर आपला मोबाईल अपग्रेड करतील त्यांना कंपनीतर्फे 30 GB डेटा दिला जाणार आहे. 


या ऑफरमध्ये सांगण्यात आलं आहे की, एअरटेलचे जे ग्राहक 2G/3G मोबाईलचा वापर करतात. त्यांना डेटा मिळवण्यासाठी 4G फोन अपग्रेड करावं लागणार आहे. यानंतर कंपनी युजर्सला दररोज 1GB डेटा देणार आहे.


'हे' करावं लागणार...


जर तुम्हीही एअरटेलचे ग्राहक आहात आणि तुमच्याकडे 3G हँडसेट आहे तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. 30GB डेटा फ्री मिळवण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला 51111 या क्रमांकावर कॉल करावा लागणार आहे. एअरटेलचा हा नंबर पूर्णपणे टोल फ्री आहे. कॉल केल्यानंतर पुढील 24 तासांत डेटा युजर्सला मिळेल.


या कंपन्या आहेत पार्टनर 


एअरटेलच्या ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आलेल्या 'मेरा पहला स्मार्टफोन' ऑफर अंतर्गत अनेक स्मार्टफोन कंपन्यांसोबत हातमिळवणी करण्यात आली आहे. यामध्ये सॅमसंग, इंटेक्स, कार्बन, लावा, सेल्कॉन, मोटोरोला, लेनोवो, नोकिया या कंपन्यांचा समावेश आहे. यापूर्वीही एअरटेलतर्फे अशा प्रकारचा प्लान लॉन्च करण्यात आला होता.