नवी दिल्ली : एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, एअरटेलने आपल्या युजर्ससाठी एक सुपरफास्ट ब्रॉडबँड प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान अशा युजर्ससाठी आहे ज्यांना फास्ट इंटरनेट स्पीडची आवश्यकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने दावा केला आहे की, या इंटरनेट स्पीड अंतर्गत ग्राहकांना 300mbps पर्यंत स्पीड मिळणार आहे. एअरटेलचा हा 300mbps चा ब्रॉडबँड प्लान 2199 रुपये मासिक या दरात उपलब्ध आहे.


असा आहे एअरटेल ब्रॉडबँड प्लान


हा प्लान खासकरुन FTTH सब्सक्रायबर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीचा नवा प्लान 1200GB चा अल्ट्रा स्पीड डेटा उपलब्ध करुन देतो. यासोबतच युजर्सला अनलिमिटेड एसटीडी/ लोकल कॉलिंगचाही फायदा मिळतो.


आणखीन कुठल्या ऑफर्स मिळणार?


या प्लानसोबत युजर्सला एअरटेल अॅप्सचं फ्री सबस्क्रिप्शनही मिळणार आहे. यामध्ये विंक म्युझिक आणि एअरटेल टीव्ही अॅपही असणार आहे. कंपनीच्या मते, विंक म्युझिकमध्ये 3 मिलियनहून अधिक गाणी आणि एअरटेल टीव्हीमध्ये 350 हून अधिक लाईव्ह चॅनल्ससोबत 10000 हून अधिक सिनेमा आणि शोज आहेत.


तुम्हाला मिळणार का हा प्लान?


300Mbps होम ब्रॉडबँड प्लान भारतातील ठराविक सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. तुमच्या परिसरात हा प्लान उपलब्ध आहे की नाही यासंदर्भात एअरटेल ब्रॉडबँड साईटवर तुम्ही चेक करु शकता.


FTTH वर आधारित हायस्पीड प्लान


भारती एअरटेल होम्सचे सीईओ जॉर्ज मॅथेन यांनी सांगितले की, "V Fiber होम ब्रॉडबँडच्या यशानंतर आम्ही FTTH वर आधारित हायस्पीड प्लान लॉन्च करत आहेत. हा प्लान अशा युजर्ससाठी आहे ज्यांना हाय स्पीड डेटाची आवश्यकता आहे. येत्या काळात आम्ही FTTH ची सीमा वाढवणार आहोत आणि ग्राहकांना होम ब्रॉडबँड प्लान्समध्ये वेगवेगळ्या प्राईस पॉईंट्सवर अधिक पर्याय देऊ."


सध्या एअरटेलची ब्रॉडबँड आणि फिक्स्ड लाईन सेवा 89 शहरांत उपलब्ध आहे. कंपनीने दावा केला आहे की, देशातील दुसरी सर्वात मोठी फिक्स्ड लाईन ब्रॉडबँड सेवा पुरवणारी कंपनी आहे.