`हे` कराल तर एअरटेलकडून मिळणार 4G चा 30 GB डाटा अगदी मोफत
भारतीत टेलिकॉम इंड्स्ट्रीमध्ये जेव्हापासून `जिओ`ची एन्ट्री झाली आहे तेव्हापासून कॉल रेट आणि डाटा पॅकेज स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी वॉर सुरू झालं आहे.
मुंबई : भारतीत टेलिकॉम इंड्स्ट्रीमध्ये जेव्हापासून 'जिओ'ची एन्ट्री झाली आहे तेव्हापासून कॉल रेट आणि डाटा पॅकेज स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी वॉर सुरू झालं आहे. टेलिकॉम इंड्स्ट्रीमधील ही स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. यामध्ये एअरटेल आणि जिओ एकमेकांना टक्कर देत आहेत. आता एअरटेलने पुन्हा नवी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये एअरटेलच्या ग्राहकांना 30 जीबी डाटा मोफत मिळणार आहे.
VoLTE चा बीटा प्रोग्राम होणार सुरू
एअरटेल आता VoLTE चं बीटा प्रोग्राम टेस्टिंग करत आहे. देशामध्ये सुरूवातीला VoLTE बीटा प्रोग्राम हा सर्वात पहिला रिलायंस जिओने आणला होता. आता एअरटेलसोबतच इतर टेलिकॉम कंपन्यासुद्धा या दिशेने काम सुरू करत आहेत.
HD कॉल करण्याची सुविधा
VoLTE बीटा प्रोग्राम टेस्टिंगमध्ये युजर्सना आकर्षित करण्यासाठी एअरटेलकडून नव्या ऑफरर्स बाजारात आणल्या जात आहेत. यामध्ये अधिकाधिक ग्राहकांनी सहभाग घ्यावा याकरिता कंपनीकडून 30 जीबी डाटा मोफत देण्यात आला आहे. VoLTE च्या मदतीने ग्राहकांना इंटरनेटने डिस्कनेट न होता वॉईस कॉल करण्याची सोय मिळणार आहे. हा कॉल HD कॉल असणार आहे.
कसा मिळणार 30 जीबी डेटा
तुम्हांला एअरटेलकडून 30 जीबी मोफत डाटा हवा असल्यास तुमच्या मोबाईलच्या सिम स्लॉटमध्ये एअरटेलचं सीम टाकणं गरजेचे आहे. त्यानंतर
VoLTE ऑप्शन स्विच ऑन करावा लागेल. यानंतर तुम्हांला 10 जीबी डाटा मिळेल. उर्वरित 20 जीबी डाटा हा सर्विस फीडबॅकनंतर देण्यात येईल. यापैकी 10 जीबी डाटा चौथ्या आणि उरलेला 10 जीबी डाटा आठव्या आठवड्यामध्ये मिळणार आहे.
कोणकोणत्या राज्यात सुरू होणार हा प्रोग्राम?
एअरटेल सध्या पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम, केरळ, बिहार, पंजाब आणि आंध्रप्रदेश या राज्यात VoLTE बीटा प्रोग्रामचं टेस्टिंग होणार आहे. याकरिता तुमचा फोन VoLTE हॅन्डसेट असणं आवश्यक आहे. तसेच एअरटेलचं सीम हे 4जी सिम असणं आवश्यक आहे.