मुंबई : जर तुम्ही एअरटेल युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेल कंपनी लवकरच आपल्या युजर्ससाठी एक सेवा सुरु करणार आहे. ही सेवा सुरु करण्यासाठी एअरटेलचा सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.


काय सेवा आहे ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानप्रवासादरम्यान आपल्याला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकावा लागतो. त्यामुळे विमानप्रवासा दरम्यान आपल्याला कोणालाही कॉल किंवा इंटरनेट सेवा वापरता येत नाही. यामुळे प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवासादरम्यान इंटरनेट आणि कॉलिंग सेवा एअरटेल टेलिकॉम कंपनी  युजर्ससाठी सुरु करणार आहे. यासाठी कंपनीने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.


गेल्या महिन्यात ह्यूजस कम्युनिकेशन इंडियाने देशातील या प्रकारचा परवाना मिळवणारी पहिली कंपनी असण्याचा मान मिळवला आहे. तसेच नाल्को या कंपनीच्या मालकीची असलेल्या सहकारी कंपनी टाटानेज सर्विसेजने ६ मार्चला हा परवाना मिळणार असल्याची घोषणा केली. सरकारने आयएफएमसीने एकदा का परवाना दिला की, विमानातून प्रवास करणाऱ्या एअरटेल युझर्सना प्रवासादरम्यान व्हॉईस कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर करता येईल. 


जल प्रवासादरम्यान या उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करुन देखील व्हॉईस कॉल करु शकतात. अशी माहिती नाल्कोकडून देण्यात आली. युरो कंसल्टनुसार, २३ हजारपेक्षा अधिक व्यवसायिक एअरक्राफ्ट मध्ये २०२७ पर्यंत प्रवाशांना इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंगसाठी लागणारी कनेक्टिव्हिटी मिळण्यास सुरुवात होईल. ज्या टेलिकॉम कंपन्यांना अशा प्रकारची सेवा सुरु करायची असते, त्यांना यासाठी स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक असते.