नवी दिल्ली : सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. आज इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. एक काळ असा होता की, १ जीबी डेटा महिनाभरासाठी वापरला जायचा. पण आता एका दिवसाला एक जीबी डेटा कमी पडतो. 


डेटा प्लॅनसोबत आणखी काही....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन वर्षात यात मोठा बदल बघायला मिळाला. मार्केटमध्ये अनेक मोठमोठ्या कंपनी आल्या आणि ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त डेटा पॅक देत आहेत. आता तर ग्राहकांना डेटा प्लॅन्ससोबत एक्स्ट्रा फायदाही हवा आहे. त्यामुळे एअरटेलने आपल्या ग्राहकांची ही गरज ओळखून एक नवीन ऑफर आणली आहे. ग्राहकांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी एअरटेलने ४९९ रूपयांचा नवा पोस्टपेड प्लॅन आणला आहे. 


काय वेगळं आहे या प्लॅनमध्ये?


एअरटेलच्या ४९९ च्या प्लॅनमध्ये यूजर्सला ४० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स तर मिळणारच सोबतच आणखीही काही फायदे या प्लॅनमध्ये मिळणार आहेत. ४९९ च्या या प्लॅनमध्ये Wynk Music आणि Airtel TV चा अ‍ॅक्सेस मोफत मिळणार आहे. Airtel TV च्या माध्यमातून ३०० टीव्ही चॅनल, क्लासिक आणि नवीन सिनेमे बघू शकाल. ४९९ रूपयांच्या या प्लॅनमध्ये ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत अ‍ॅमेझॉन प्राइमचं सब्सक्रिप्शन मिळेल.