सावधान! `या` प्रकारच्या वेबसाईटवरुन Hack होऊ शकतो तुमचा बँक अकाउंट
कोविड -19 साथीच्या प्रारंभापासून, 5 हजाराहून अधिक महामारी संबंधित फिशिंग वेबसाइट्स उदयास आल्या आहेत.
मुंबई : कोरोना महामारीनंतर जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतींकडे वळली आहेत. ज्यामुळे देश डिजिटायझेशनकडे जातोय असे म्हणायला काही हरकत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचा उलटा परिणाम देखील दिसू लागला आहे. कारण यामुळे ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार देखील वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोविड -19 साथीच्या प्रारंभापासून, 5 हजाराहून अधिक महामारी संबंधित फिशिंग वेबसाइट्स उदयास आल्या आहेत. ज्या कोविड चाचण्यांवर वापरकर्त्यांना ऑफर आणि सवलतीच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.
अलीकडे, बनावट QR कोडसाठी फिशिंग जाहिराती आणि रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी लसीकरण प्रमाणपत्रे लोकप्रिय झाले आहेत.
फिशिंग वेबसाइटचे दहा लाखांहून अधिक वापरकर्ते
सायबर सिक्युरिटी फर्म कास्परस्कीच्या मते, मार्च 2020 ते जुलै 2021 पर्यंत, अशा फिशिंग वेबसाइट्सना भेट देणारे युझर्स एक मिलीयनपेक्षा जास्त आहे.
महामारीशी संबंधित घोटाळ्याची ही क्रिया मार्च 2021 मध्ये शिगेला पोहोचली. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या प्रयत्नांना वेग देण्यापूर्वी कास्परस्की संशोधकांनी जूनमध्ये यामध्ये किंचित घट पाहिली. या महिन्यादरम्यान, कास्परस्कीने मे महिन्यापेक्षा 14 टक्के अधिक साथीच्या रोगांशी संबंधित फिशिंग वेबसाइट शोधल्या. या सगळ्या वेबसाईट्स सध्या बंद करण्यात आल्या आहेत.
महामारीशी संबंधित फसवणूकीत, बहुतेक सायबर गुन्हेगारांचे लक्ष हे वापरकर्त्यांचे डेटा मिळवण्यावर आहे. असे कॅस्परस्की येथील सामग्री फिल्टरिंग पद्धती विकास प्रमुख अलेक्सी मार्चेन्को म्हणाले.
वापरकर्ता जाहिरात किंवा ईमेलमधील लिंक फॉलो करतो आणि एका पानावर जातो जिथे त्यांना वैयक्तिक माहिती आणि बँक कार्ड तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते आणि एकदा का त्या हॅकर्सना ही डिटेल्स मिळाले की, ते तुमच्या खात्यातून पैसे चोरतात.
कोविड चाचण्या आणि लसीकरणाशी संबंधित फिशिंग हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार नेहमी त्यांच्या हल्ल्यांचे नियोजन करण्याच्या आणि सध्याच्या ट्रेंडशी सुसंगत राहण्याच्या संधीच्या शोधात असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या संभाव्य पीडितांचे अधिक लक्ष वेधण्यास मदत होते.
कास्परस्की (दक्षिण आशिया) चे जनरल मॅनेजर दीपेश कौर म्हणाले, "अशा संभाव्य हल्ल्यांपासून दूर राहण्यासाठी, इंटरनेट वापरकर्त्यांच्या डिव्हाइसमध्ये विश्वसनीय सुरक्षा उपाय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जागरूक राहा आणि कोणत्याही लिंकवर तुमची माहिती आणि कागदपत्रे टाकणे टाळा.