मुंबई : ऍमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल (GREAT INDIAN Festival) सुरू आहे. जेथे स्मार्टफोन्सवर आधारीत अनेक ऑफर्स मिळत आहेत. महागडे फोन देखील येथे स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे OPPO A31 ऍमेझॉनवर जवळपास 700 रुपयात खरेदी करता येऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

OPPO A31 ऑफर आणि डिस्काऊंट
OPPO A31 ची किंमत 15999 रुपये आहे. परंतु ऍमेझॉनवर हा फोन 28 टक्के डिस्काऊंटवर मिळत आहे. म्हणजेच फोनची किंमत 11 हजार 490 रुपये इतकी आहे.  एक्सचेंज ऑफरअंतर्गत तुम्ही हा फोन 700 रुपयांमध्येदेखील खरेदी करू शकता. या फोनवर 10 हजार 750 रुपयांची एक्सचेंज ऑफर सुरू आहे.


जर तुम्ही तुमचा फोन एक्सचेंज करू इच्छित असाल तर, तुम्हाला एवढी सूट मिळू शकते. परंतु ही ऑफर फोनच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून आहे. तुम्ही पूर्ण 10 हजार 750 पर्यंतचा एक्सचेंज ऑफर घेण्यास पात्र असाल तर, हा OPPO A31 हा फोन तुम्ही फक्त 700 रुपयांत खरेदी करू शकता.


OPPO A31चे स्पेसिफिकेशन्स
स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा वाटरड्रॉप मल्टी-टच-स्क्रीन डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 89 टक्के स्क्रीन टु बॉडी रेशो आहे. स्मार्टफोनमध्ये 6 GB आणि 128 GB  इंटर्नल स्टोरेज असून ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आहे. 
यामध्ये एआय ब्युटिफिकेशन टेक्निकसोबत 8 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे.