नवी दिल्ली: भारतात कोरोनाची लाट आल्यानंतर बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला. इतकच नाही तर शिक्षणही ऑऩलाइन सुरू झालं. त्यामुळे लॅपटॉपची गरज वाढली. कोव्हिड काळात बहुतेक घरांमध्ये लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणत वाढला. शाळा-कॉलेजपासून ऑफिसच्या कामापर्यंत प्रत्येकजण लॅपटॉप वापरत आहे. अशा परिस्थितीत स्वस्त आणि टिकाऊ लॅपटॉप ही लोकांची गरज बनली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी लॅपटॉप दुकानातून खरेदी करा तर खूप जास्त महाग पडतो. कोरोना काळात आणि फेस्टिव सीझन असल्याने ऑनलाइन शॉपिंगवर खूप जास्त सूट मिळत आहे. याच दरम्यान लॅपटॉपवरही भरगोस सूट मिळत असल्याने लॅपटॉप खरेदी करण्याची योग्य वेळ आहे.  


तुम्ही स्वस्त आणि चांगला लॅपटॉप शोधत असाल तर अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्हाला लॅपटॉपवर प्रचंड सूट मिळू शकते. तुम्हाला एकच नाही तर 4 लॅपटॉप तेही तुमच्या बजेटमध्ये मिळू शकतात. 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतात. हे लॅपटॉप नेमके कोणते आहेत जाणून घेऊया.


आसुस क्रोमबुक फ्लिप 


आसूस कंपनीचा लॅपटॉप काही महिन्यांपूर्वीच लॉन्च आला होता. या लॅपटॉपमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या लॅपटॉपला 11.6 इंचाच्या डिस्प्ले, वजन 1.20 आहे. हा सेलेरॉन डुअल-कोर प्रोसेसर चालतो. एकापेक्षा जास्त USB पोर्ट, 4 GB रॅम आणि मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. तुम्ही अमेझॉनवरून हा लॅपटॉप 24,999 रुपयांमध्ये Asus Chromebook Flip खरेदी करू शकता.


एचपी क्रोमबूक


एचपी कंपनीचा क्रोमबूक 14 इंच स्क्रीनसह 27,990 रुपयांमध्ये अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. टच स्क्रीन डिस्प्ले असलेला हा लॅपटॉप वजनाला हलका आणि बारीक असून इन-बिल्ट गुगल अॅप्समध्ये देखील येतो. मेमरी बद्दल बोलायचे तर, सेलेरॉन एन 4020 प्रोसेसर यामध्ये देण्यात आला आहे, हा लॅपटॉप 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. ज्याची मेमरी मायक्रो एसडी कार्ड च्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.


लेनोवो कंपनीचा लॅपटॉप 


अमेझॉनवर 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. लेनोवो आयडिया-पॅड स्लिम 3 मध्ये 15.6 इंचाचा डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1,366 x 768 पिक्सेल आहे. Intel Celeron N4020 प्रोसेसर आहे. हा लॅपटॉप 4GB RAM आणि 256GB SSD सह येतो. त्याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांपर्यंत टिकू शकते असा कंपनीचा दावा आहे. त्यात MS Office आणि Student 2019 सारखे अॅप्स आधीच इन्स्टॉल करून देण्यात आलं आहे.


15.6-इंच डिस्प्ले आणि 1920 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला ह्या पटॉपमध्ये एएमडी ऐथलॉन गोल्ड 3150U प्रोसेसर देण्यात आला आहे. युझर्सना या लॅपटॉपमध्ये 4GB रॅम आणि 1TB HDD सुविधा मिळेल. बॅटरीबद्दल बोलताना, कंपनीने दावा केला आहे या लॅपटॉबची बॅटरी लॅपटॉप 5.5 तास टिकते. त्याची किंमत 29,990 रुपये आहे.


तुम्हाला गेमिंगसाठी लॅपटॉप हवे असतील तर तुम्हाला आणखी काही पैसे गुंतवावे लागतील, परंतु हे लॅपटॉप रोजच्या वापरासाठी पुरेसे आहेत. सध्या अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल 4 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि संपूर्ण महिनाभर चालणार आहे. त्यानिमित्तानं तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी कमी किंमतीमध्ये या ऑनलाइन साईटवर उपलब्ध होऊ शकतात.