बंगळूर : अॅमेझॉनने  ई-बुक रीडर 'किंडल ओएसिस' चे नवे व्हर्जन लॉन्च केले. यात हाय रिजोल्यूशन 'पेपरवाइट डिस्प्ले' आहे आणि खास गोष्ट म्हणजे हे पहिले व्हाटरप्रूफ उपकरण आहे. नव्या किंडल ओएसिसचे ८ जीबी मॉडेल २१,९९९ रुपयांना आणि ३२ जीबी मॉडेल २८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. मात्र यासाठी तुम्हाला प्री आॅर्डर करावी लागेल. 'किंडल ओएसिस' ची बॅटरी आठवडाभर चालेल. हे डिव्हाईस लवकर चार्ज होत असल्याने ते २ तासापेक्षा कमी वेळात पूर्ण चार्ज होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅमेझॉन डिव्हाईसचे वरिष्ठ उपाध्यक्ष डेव लिम्प यांनी सांगितले की, "कोणतंही पुस्तक ६० सेकंदापेक्षा कमी वेळेत उपलब्ध व्हावे, हा विचार करून आम्ही किंडल लॉन्च केले होते." यात ७ इंचासोबत ३०० पीपीआय आणि व्हाटरप्रूफ डिसप्ले आहे. 'किंडल ओएसिस' हा आतापर्यंतचा सगळ्यात आधुनिक किंडल आहे. हे डिव्हाईस अत्यंत पातळ आणि हलके असल्याने हाताळणे सोपे होईल. 


७ इंच ३०० पीपीआय डिस्प्लेसोबत या डिव्हाईसमध्ये एका पानावर ३०० अधिक शब्द मावतात. त्याचबरोबर याची पाने देखील इतर किंडलपेक्षा अधिक सहज पलटतात. यातील लेजर-गुणवत्ता मुळे शब्द उन्हात देखील नीट वाचता येतात. 


यात ३.४ एमएमचा डिसप्ले असून त्यावर मजबूत ग्लास कव्हर आहे. याच्या मागे नवीन अल्युमिनियम दिलेले आहे.  'किंडल ओएसिस' ६० मिनिटांपर्यंत पाण्यात बुडवून ठेवता येतो. युजर्स याला कव्हर देखील घालू शकतात. जे पुस्तकाप्रमाणे उघडते. कव्हर उघडल्यानंतर किंडल आपोआप सुरु होईल आणि कव्हर बंद केल्यावर डिव्हाईस देखील बंद होईल. व्हॉटरप्रूफ कव्हर २,९९९ रुपयांना तर प्रीमियम लेदरचे कव्हर ३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.