Amazon Republic Day Sale: सणा-सुदीच्या काळात किंवा देशातील उत्सव काळात अनेक ई-कॉमर्स कंपन्यामध्ये डिस्काउंट सेल सुरू होतात. आताच नाताळ आणि नववर्षाचे सेल संपले आहेत. मात्र, तुमची काही खरेदी बाकी असेल तर तुम्हाला आत्ताही डिस्काउंटमध्ये खरेदी करता येऊ शकते. कारण, भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी अनेक ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेल आयोजित करतात. अॅमेझॉननेही Amazon Republic Day Sale ची घोषणा केली आहे. या सेलदरम्यान तुम्हाला अनेक प्रोडक्ट स्वस्त दरांत उपलब्ध होणार आहेत. ईकॉमर्स प्लॅटफॉर्मने एक पेज तयार केले आहे. यात म्हटलं आहे की, बँक कॅशबॅक व्यतिरिक्त 75 टक्क्यांचे डिस्काउंट मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 Amazon Republic Day Sale कधी सुरू होणार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, डिस्काउंट किती असणार याची माहिती मात्र समोर आलेली आहे. या सेलदरम्यान युजर्सना Great Deals, No Cost EMI आणि Exchange ऑफर मिळणार आहे.  Amazon Republic Day Sale पोस्टरवर लिस्टेड डिटेल्सची माहिती देण्यात आलेली आहे. 


सेल दरम्यान ग्राहकांना 10 टक्क्यांपर्यंतचे इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. तसंच, प्राइम मेंबर्सना अर्ली अॅक्सेस मिळेल. म्हणजेच युजर्सना डिस्काउंट आणि ऑफर्स, वन डे डिलिव्हरी मिळेल. अॅमेझॉनच्या या सेलदरम्यान स्मार्टफोनवर अनेक जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहेत. यात iPhoneपासून ते सॅमसंग, iQOOसारखे स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळेल. अनेक हँडसेडवर सेव्हिंगची चांगली संधी आहे. लिस्टेड डिटेल्सनुसार, मोबाइल आणि अॅक्सेसीरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे. 


अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत लॅपटॉप आणि स्मार्टवॉच 


अॅमेझॉनच्या या सेलमध्ये 75 टक्क्यांपर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे. लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि अन्य वस्तूंवर डिस्काउंट मिळणार आहे. लिस्टेड डिटेल्सनुसार, लॅपटॉपवर 40 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. त्याव्यतिरिक्त 80 टक्के सूट हेडफोनवर मिळणार आहे. 


टिव्ही, वॉशिंग मशीनवर 65 टक्के डिस्काउंट


अॅमेझॉन सेलवर टीव्ही आणि इतर अॅप्लायन्सवर 65 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. यात टीव्ही, स्मार्ट टिव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि AC यांचा समावेश आहे. तसंच, एक्सचेंज केल्यास 10 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. ग्राहकांना या सेलमध्ये खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. पण हा सेल कधी सुरू होणार याची माहिती अद्याप सांगण्यात आलेली नाही.