Anand Mahindra Car Collection: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या माध्यमातून आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेटकऱ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना आनंद महिंद्रा खूप जवळचे वाटतात. इतकी मोठी व्यक्ती आपल्याशी संवाद साधते, याचच अनेकांना आश्चर्य वाटतं. त्याच्याकडे अब्जावधींची संपत्ती असून त्याची कंपनी दरवर्षी लाखो कार विकते. अशा परिस्थितीत खुद्द आनंद महिंद्रा यांच्याकडे कोणती कार आहे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. आनंद महिंद्रा केवळ त्यांच्याच कंपनीची म्हणजेच महिंद्राच्या गाड्या वापरतात. त्याचा ताफ्यात मर्यादित गाड्या आहेत. चला तर जाणून घेऊयात आनंद महिंद्राकोणत्या गाड्या वापरतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Mahindra Bolero Invader: या गाडीची विक्री कंपनीने बंद केली आहे. असं असलं तरी आनंद महिंद्रा अजूनही ही गाडी वापरतात. या एसयूव्हीला तीन दरवाजे आहेत. रेग्युलर बोलेरोपेक्षा ही गाडी अधिक स्पोर्टी दिसते. एसयूव्हीला सॉफ्ट टॉप, मागच्या बाजूला फेसिंग बेंच सीट्स आणि 2.5-लिटर डिझेल इंजिन मिळते.


Mahindra TUV300: आनंद महिंद्रा यांनी 2015 मध्ये स्वतःसाठी TUV 300 खरेदी केली होती. या गाडीचा रंग ऑलिव्ह ग्रीन कलर असून कस्टमाईज केले आहे. वाहनाला रग्ड लूक देण्यासाठी त्याला एक आर्मर किटही बसवण्यात आलं आहे. या गाडीची किंमत 7-8 लाख रुपये आहे.


Mahindra Scorpio: महिंद्रा स्कॉर्पिओ हे कंपनीचे लोकप्रिय वाहन आहे, या गाडीचा वापर खुद्द आनंद महिंद्रा देखील करतात. आनंद महिंद्रा यांच्याकडे फर्स्ट जनरेशन स्कॉर्पिओ आहे. ही गाडी काळ्या रंगात आहे. या वाहनात 4X4 फीचर देखील देण्यात आले आहे.


Mahindra Alturas G4: ही कंपनीची सर्वात महागडी आणि फ्लॅगशिप कार आहे. ही कार टोयोटा फॉर्च्युनरशी स्पर्धा करते. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या Alturas G4 चे नाव Baaz असे ठेवले आहे. कारची डिलिव्हरी मिळाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी आपल्या नवीन कारचे नाव देण्यासाठी एक ट्विट केले होते.