Anand Mahindra Question On A Square Wheel Bicycle: जग हे फार चित्रविचित्र गोष्टींनी भरलेलं आहे असं म्हणतात. अनेकदा खरोखरच अशा गोष्टी पाहायला, वाचायला किंवा ऐकायला मिळतात की खरंच असं असू शकतं का असा प्रश्न पडतो. या गोष्टींबद्दल समजल्यानंतर आपण थक्क होतो. हल्ली तर प्रयोगाच्या नावाखाली ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींबद्दल संशोधन केलं जात आहे हे वाचून, ऐकून किंवा पाहूनही थक्क व्हायला होतं. यापैकी बऱ्याच गोष्टी या गरज ही शोधाची जननी असते असं म्हणत खरोखरच लोकांच्या फायद्याच्या आहेत यात शंका नाही. मात्र त्यात अशाही अनेक गोष्टी असतात की ज्या पाहून खरंच हे तयार करण्याची, यावर वेळ घालवण्याची गरज आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. भारतामधील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनाही असाच काहीसा प्रश्न एक भन्नाट संशोधन पाहून पडला आहे.


चौकोनी चाकांची सायकल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रांनी एक विचित्र व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, जो तुम्हालाही पडू शकतो. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक चौकोनी चाकं असलेली सायकल दिसत आहे. खरं तर हा व्हिडीओ पाहण्याआधी तुम्ही स्वत: अशी चौकोनी चाकांची सायकल पाहिल्यानंतर काय विचार कराल बरं? हे असं काही प्रत्यक्षात पाहिलं तरी तुम्ही बुचकाळ्यात पडाल. मात्र अशी सायकल खरंच तयार करण्यात आली आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी आनंद महिंद्रांनी तो आता शेअर केला आहे. व्हिडीओ क्लिपमधील सायकलची चाकं चक्क चौकोनी आहेत.


आनंद महिंद्रांचं म्हणणं काय?


'द क्यू' नावाच्या युट्यूब चॅनेलवरुन ही सायकल बनवण्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. याच व्हिडीओतील तुकडा आनंद महिंद्रांनी शेअर केला आहे. 17 सेकंदांचा ही चौकोनी चाकांची सायकल एकजण चालवत असल्याचा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी मोजक्या शब्दांमध्ये कॅप्शन दिली आहे. "माझा फक्त एकच प्रश्न आहे, का???" अशी कॅप्शन या व्हिडीओला आनंद महिंद्रांनी दिली आहे. अर्थात हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हा प्रश्न पडणं सहाजिक आहे. कारण गोल चाकाची सायक इतक्या उत्तम प्रकारे चालक असताना अशी सायकल बनवण्याची गरज काय होती असा प्रश्न महिंद्रांना पडला आहे. या सायकलला सामान्य सायकलप्रमाणे चैन दिसत आहे. 



'द क्यू' नावाच्या युट्यूब चॅनेलवर या सायकलचा संपूर्ण व्हिडीओ पाहता येईल.