तुमच्याही स्मार्टफोनमध्ये मिळणार नवा अँड्रॉईड OS, पण केव्हा? जाणून घ्या
तुमच्या स्मार्टफोनमध्येही आता Android 13 हे नवं अँड्रॉईड अपडेट मिळणार आहे. Android 13 चं नवं अपडेट कोणत्या स्मार्टफोनमध्ये आणि केव्हा मिळेल याबद्दल जाणून घ्या...
मुंबई : कित्तेक महिन्याच्या बीटा टेस्टिंगनंतर गूगलने Android 13 चं स्टेबल व्हर्जन रिलीज केलं आहे. हे नवं ऑपरेटिंग सिस्टिम, नव्या लूक आणि सिक्यूरिटी फीचर्ससोबतच अनेक बदल आणि इंप्रूव्हमेंट घेऊन आलं आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील नवा अॅड्रॉईड OS सर्वात प्रथम Google Pixel या स्मार्टफोनला मिळालं आहे. इतर स्मार्टफोनब्रँड देखील याच वर्षी त्यांच्या यूजर्ससाठी Android 13 अपडेट रोल आउट करतील.
Android 13 अपडेट हे Pixel 3, Pixel 3 XL, Pixel 3a आणि Pixel 3a XL या स्मार्टफोन्सला मिळणार नाहीये. गूगलने सांगितलंय की, नवं ऑपरेटिंग सिस्टिम Pixel 4 आणि त्याच्या वरील डिव्हाईसवर हे अपडेट मिळणार आहे, ज्यामध्ये Pixel 4a या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. जर तुमचा स्मार्टफोन Pixel 4 किंवा 4a किंवा यानंतरचे मॉडेल असेल तर तुम्ही आत्ताही नवं अँड्रइड अपडेट करु शकता.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये केव्हा असेल Android 13?
गूगूलने त्यांच्या The Keyword ब्लॉगवर सांगितलंय की, Android 13 हे नवं अपडेट याच वर्षी तुमच्या स्मार्टफोनमध्ये असेल. कंपनीने यादीमध्ये काही स्मार्टफोन कंपन्याच्या नावे देखील जाहीर केले आहेत.
Samsung
Asus
HMD (Nokia)
iQOO
Motorola
OnePlus
Oppo
Realme
Sharp
Sony
Tecno
Vivo
Xiaomi
या कंपन्यांपैकी सर्वात आधी अँड्रॉइड 13 अपडेट पुश करणारे ब्रँड सॅमसंग आणि ओप्पो असू शकतात. ओप्पो ColorOS 13 वर फोकस्ड इव्हेंट होस्ट करणार आहे. त्याचबरोबर, सॅमसंग कंपनी त्यांच्या गॅलक्सी S22 सिरिजवर नव्या OS वर आधारित OneUI 5 टेस्ट करत आहे.
सॅमसंग कंपनी ही कायम नवा अँड्रॉईड व्हर्जन रिलीजच्या काही महिन्यातच नवे अपडेट रोल आउट करते. कंपनीने मागच्या वर्षी अँड्रॉईड 12 च्या रिलीजच्या तीन महिन्यातच त्यांच्या डिव्हाईसवर नवा OS रोस आऊट केला होता. यावेळी देखील सॅमसंग नव्या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित OneUI 5 ला याआधीपेक्षा लवकर लाँच करेल अशी अपेक्षा आहे.
यासोबतच Asus, Nokia, OnePlus, Realme, Samsung, Sharp, Tecno, Vivo, Xiaomi आणि ZTE यासारख्या कंपन्यासुद्धा गूगलचे Android 13 बीटा प्रोग्रामचा भाग आहेत आणि यांनी त्यांच्या काही डिव्हाईसवर गूगलचं नवं ऑपरेटिंग सिस्टिमचं बीटा व्हर्जन रोल आऊट केलं होतं.