चोरीला गेलेला अँड्रॉइड फोन लगेच सापडेल, स्विच ऑफ केल्यानंतरही कळेल Location
Mobile App : गुगल प्ले स्टोअरवरून हे मोबाईल अॅप तुम्ही डाउनलोड करू शकता.
Google Playstore: स्मार्टफोनचा (smartphone) वापर झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकदा स्मार्टफोन हरवतो अथवा चोरीला गेल्याचे समोर येत असते. छोट्याशी चुकीमुळे फोन चोरीला जातो. फोन चोरीला गेल्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र सोबतच खासगी डेटा लीक होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे चोरीला गेलेला फोन परत मिळवायचा कसा ? असा प्रश्न समोर येतो. पण, चोरीला गेलेला फोन तुम्ही सहजपणे ट्रॅक करू शकता. फोन बंद झाल्यानंतर त्याचा माग काढण्यात खूप अडचणी येतात.
पण, तुम्ही फोन बंद केल्यानंतरही तो ट्रॅक (mobile track) करता येतो. यासाठी तुम्हाला अँड्रॉइड अॅपची (mobile app) मदत घ्यावी लागेल. त्याचबरोबर तुमचा फोन चोरीला गेला असेल, तर सर्वप्रथम पोलिसांत तक्रार करा. तुम्ही पोलिसांना फोन ट्रॅक (phone track) करण्याची विनंती देखील करू शकता. अनेक प्रकरणांमध्ये, पोलिस फोन ट्रॅक करतात आणि तो योग्य मालकाकडे सोपवतात. तथापि, आधीपासून काही सुरक्षा टिप्स अवलंबून तुम्ही तुमचा फोन सहजपणे ट्रॅक करू शकता. यासाठी अनेक अॅप्स सहज उपलब्ध होतील.
अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध
अँड्रॉईड युजर्स ते गुगल प्ले स्टोअरवरून (google play store) तुम्हाला Track it EVEN हे अॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. हे अॅप हॅमर सिक्युरिटीने (App Hammer Security) विकसित केले आहे. हे मोबाईल अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तसेच या अॅपचे सेटअप करणे देखील खूप सोपे आहे.
वाचा : Whatsapp वरून Photo, Video पाठवण्यापूर्वी ही बातमी वाचाच!
या अॅपला सुरु करण्यासाठी तुम्हाला काही परवानग्या देखील द्याव्या लागतील. या अॅपमध्ये डमी स्विच ऑफ (Dummy switch off) आणि फ्लाइट मोडची सुविधा देखील आहे. यामुळे फोन स्वीच ऑफ केल्यानंतरही तो बंद होत नाही आणि तुम्हाला चोराचे लोकेशन लगेच समजते.
हे अॅप तुमच्या फोनची सर्व एक्टिविटी जसे की चोराचे लोकेशन, जो व्यक्ती तुमचा फोन वापरत आहे त्याचा फोटो आणि इतर माहिती तुमच्या दिलेल्या आपत्कालीन नंबरवर पाठवत राहील. या अॅपमुळे तुम्हाला तुमच्या फोनचे लाईव्ह लोकेशनही समजू शकेल.
त्यामुळे तुमचा फोन ट्रॅक करणे खूप सोपे होते. तुम्हीही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर हे अॅप तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. गुगल प्ले स्टोअरवरही याला खूप चांगले रेटिंग देण्यात आले आहे. त्यामुळे तुमचा फोन चोरीला गेल्यास हे अॅप तुम्हाला तुमचा फोन परत मिळावयास नक्कीच मदत करेल.