Android Update: अ‍ॅंड्रॉइड युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अ‍ॅंड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सुधार आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या गुगलने आता एक नवे अपडेट आणले आहे. यामुळे अ‍ॅंड्रॉइड यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होऊ शकणार आहे. गुगल आणणारे हे फिचर इतकं मस्त आहे की कोणत्याच युजर्सने याची कल्पना केली नसेल. काय आहे हे फिचर? याचा युजर्सला कसा फायदा होईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल सध्या दुसऱ्या फोनवर व्हिडीओ कॉल ट्रान्सफर करण्याच्या फीचरवर काम करत आहे. आणि हे फिचर लवकरच रोल आउट केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. गुगल गेल्या महिन्यापासून 'डिव्हाइस ग्रुप' नावाच्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर येणारे व्हिडीओ कॉल्स दुसऱ्या फोनवर सहजपणे ट्रान्सफर करू शकाल.  9to5 ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.  


अ‍ॅंड्रॉइड डिव्हाईसमधील लिंक फीचर काढून 'डिव्हाइस ग्रुप' नावाचे फीचर आणत आहे. गुगलच्या या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या गुगल खात्याशी लिंक असणारी सर्व उपकरणे सहजपणे कनेक्ट करू शकणार आहात.


या फिचरमुळे तुम्हाला येणारे व्हिडीओ कॉल्स तुम्ही डिव्हाइस ग्रुप्स फीचरसह कनेक्ट केलेल्या सर्व डिव्हाइसेसवर ट्रान्सफर करू शकाल. सध्या या फीचरबाबत गुगलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण येत्या काही महिन्यांत ते सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.


सॅमसंगचा जबरदस्त सेल, टीव्ही खरेदी केल्यास गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोन मोफत


Samsung Galaxy स्मार्टफोन्स, टॅबलेट, एक्ससरीज, वेअरेबल्स, टीव्हीसह अन्य उपकरणांवर तुम्ही घसघशीत सूट मिळणार आहे. अगदी कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकणार आहात. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट Samsung.com, Samsung एक्सक्लूसिव स्टोर्स और सॅमसंग शॉप अॅपवर या सेलअतर्गंत तुम्ही खरेदी करु शकणार आहात. हा सेल 5 ऑक्टोबरपासूनच सुरू झाला असून किती दिवस असणार आहे याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. या सेलचे एक वैशिष्ट्य म्हणजे टीव्ही खरेदी केल्यानंतर प्रिमियम स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. 


टीव्हीवर फोन फ्री


ग्राहक 98 इंचाचा QLED आणि Neo QLED TV मॉडेल खरेदी करु इच्छित असतील तर त्यांना Galaxy S23 Ultra 5G स्मार्टफोन मोफत दिला जाणार आहे. तर, काही निवडक OLED, QLED आणि UHD TV मॉडल्स खरेदी केल्यास मोफत सॅमसंग साउंडबार (Q900A किंवा S800B) फ्री मिळणार आहे. तर एकीकडे Neo QLED मॉडल खरेदी केल्यास 50 इंचाचा The Serif TV एकदम मोफत मिळणार आहे. तर, या संधीचा आत्ताच फायदा घ्या अन् भरघोस डिस्काउंट मिळवा.