Apple : अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडल्यानंतर अमेरिकेतील आयफोन निर्माण करणाऱ्या ऍपल कंपनीने भारतामध्ये उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत.  जर तुम्हीही ॲपलचे आयफोन (iPhones) आणि आयपॅड (iPads) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारने (Government of India) ही उत्पादने (iPhones-iPads) वापरणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण ही डिव्हाइस कधीही हॅक (Hack) होऊ शकते.


आयफोन-आयपॅडचे हे मॉडेल वापरणाऱ्यांनी सावधान!


आयफोन आणि आयपॅडचे कोणते मॉडेल (iPad model) हॅक होण्याचा धोका आहे हे जाणून घेऊया. CERT-In च्या सल्ल्यानुसार, iOS 16.1 आणि 16.0.3 च्या आधीच्या आवृत्त्या आणि iPadOS 16 च्या आधीच्या आवृत्त्यांना धोका आहे.


नोटमध्ये या समस्येमुळे प्रभावित झालेल्या उपकरणांची नावे देखील आहेत. या सूचीमध्ये iPhone 8 आणि वरील सर्व मॉडेल्स, iPad Pro चे सर्व मॉडेल, iPad Air 3rd Gen आणि त्यावरील, iPad 5th Gen आणि त्यावरील आणि iPad Mini 5th Gen आणि त्यावरील सर्व मॉडेल्सचा समावेश आहे.


सरकारने इशारा दिला आहे


Apple वापरकर्त्यांना एका नवीन सुरक्षा समस्येबद्दल सतर्क करण्यात आले आहे की, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीम (CERT-In) ने ‘उच्च धोका’ म्हणून वर्गीकृत केले आहे.


या जोखमीमुळे, हॅकर्स या उपकरणांमध्ये सहज प्रवेश करू शकतील. म्हणजेच ते डिव्हाइस हॅक करू शकतील आणि नंतर त्याद्वारे आपल्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करू शकतील. या भेद्यतेचे वर्गीकरण CVE-2022-42827 असे करण्यात आले आहे.


वाचा : कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवेल लाल कोबी; जाणून घ्या फायदे


हे त्वरित करा अन्यथा डिव्हाइस हॅक होऊ शकते


जर तुमच्या आयफोन किंवा आयपॅड मॉडेल्सचा या यादीत समावेश असेल तर घाबरण्याची गरज नाही कारण तुम्ही हा धोका टाळू शकता. Apple ने या समस्येसाठी एक सॉफ्टवेअर पॅच जारी केला आहे, म्हणजेच तुम्हाला तुमचा iPad किंवा iPhone ताबडतोब अपडेट करावा लागेल आणि त्यामुळे तुम्हाला हॅकर्सच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळेल.