Apple Car : ना खिडकी ना स्टीयरिंग, पाहा कशी असेल ही जबरदस्त कार
Apple ची कार अधिक चर्चेत आहे. कारण याआधी कधीही न पाहिलेले फीचर या कारमध्ये पाहायला मिळणार आहे.
Apple Car : 2014 मध्ये Apple ने त्यांच्या ऑटोमॅटिक वाहनावर काम करण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांनंतर आता पुन्हा याबाबत नवी माहिती पुढे येऊ लागली आहे. एका रिपोर्टनुसार, या कारमध्ये ड्रायव्हरचे नियंत्रण नसेल.
अॅपलला कारशी संबंधित अनेक पेटंटही मिळाले आहेत. त्यामुळे या कारमध्ये अनेक संभाव्य फीचर काय असतील याची माहिती ही पुढे आली आहे. पेटंट अधिक मनोरंजक आहे. कंपनी पुन्हा सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांमध्ये रस घेत आहे. एका रिपोर्टनुसार, वाहनात ना स्टीयरिंग व्हील असेल ना पेडल.
Vrscout च्या अहवालानुसार, कंपनीने युनायटेड स्टेट्स पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे पेटंट दाखल केले आहे. हे पेटंट कारमधील VR मनोरंजन प्रणालीसाठी आहे. जे प्रवाशांना इन-हेडसेट अनुभव देण्यासाठी वाहनाच्या गतीचा उपयोग करेल.
मनोरंजनाव्यतिरिक्त, कंपनीने पेटंट तपशीलांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, या तंत्रज्ञानामुळे मोशन सिकनेस कमी होईल. म्हणजेच प्रवाशांना कारच्या खिडकीऐवजी व्हीआर हेडसेटद्वारे बाहेरचे दृश्य पाहता येणार आहे. हे वाहनाच्या बाहेर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने होईल.
या तंत्रज्ञानाद्वारे प्रवास करताना स्थिर वातावरणात कोणत्याही बाहेरच्या अडचणींशिवाय व्हिडिओ पाहू शकतात किंवा पुस्तके वाचू शकतात. याशिवाय रस्त्यावरून जाताना व्हर्च्युअल मीटिंगही करता येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, Apple ही सेल्फी ड्रायव्हिंग कार 2025 मध्ये लॉन्च करू शकते. त्यामुळे या कारसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.