मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अॅपल कंपनी त्यांच्या चार नव्या आयफोन मॉडेलचे लाँचिंग पुढे ढकलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अॅपलच्या या नव्या आयफोनना 5 जी कनेक्शन असेल. याशिवाय अॅपल दुसऱ्या सहामाहीत उत्पादनही कमी करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहेच, शिवाय ग्राहकांचं आर्थिक गणितंही बिघडलं आहे. विशेष म्हणजे आयफोनची मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिका आणि युरोपमध्येच कोरोनाचे मोठे संकट आल्यामुळे त्याचा मोठा परिणाम विक्रीवरही होणार आहे. त्यामुळे या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्येही आयफोनचं उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी कमी केलं जाईल, असं वृत्त वॉल स्ट्रीट जनरलने आहे.


5 जी फोन लाँच करण्याच्या बाबतीत अॅपल त्या कंपनीचे प्रतिस्पर्धी सँमसँग आणि हुवेई या कंपन्यांपेक्षा एक वर्षे मागे आहे. त्यामुळे यावर्षी 5 जी फोन लाँच करण्याचे लक्ष्य अॅपलने ठेवले होते. या वर्षीच्या अखेरीला नवी मॉडेल लाँच करण्याचे नियोजन होते. आता त्याला किमान महिनाभराचा विलंब होण्याची शक्यता आहे.


अँपलने १० कोटी हॅन्डसेट बनवण्याची तयारी या वर्षाच्या सुरुवातीला केली होती. त्यात चार वेगवेगळ्या डिजाईनच्या नव्या मॉडेलचा समावेश होता. पण कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे या नियोजनावर परिणाम झाला आहे.


अॅपल मुख्यालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात घरूनच काम करत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य उद्योगांवर कॅलिफोर्निया सरकारने निर्बंध घातल्याने हे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच आयफोन कधी लाँच होतील याबाबतच्या तारखा निश्चित होऊ शकतील. मे महिन्यामध्ये याबाबतचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. पण कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता 5 जी फोनचं लाँचिंग फारतर २०२१ पर्यंत पुढे जाऊ शकतं. पण अँपलने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.