मुंबई : Apple प्रेमी सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत असताना त्यांना ऑगस्ट महिन्यातच एक गुड न्यूज मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Apple iPhone 8 संबंधित बातम्या येत असतानाच आता मॉडेल iPhone 7s आणि iPhone 7sPlus बाबत मार्केटमध्ये चर्चा होताना दिसते. हे दोन iPhone मॉडेल देखील लवकरच लाँच होणार आहेत. असं असताना आज Apple च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, iPhone 7s Plus च्या डम्मी मॉडेलचा फोटो लिंक झाला आहे. आणि आता या फोटोची मार्केटमध्ये जोरदार चर्चा आहे. 


पहिल्यांदा या iPhone 7s Plus च्या डम्मी मॉडेलचे अगदी रेअर पॅनेल लिक झाले आहे. त्यानुसार अगदी शाइन करणारी ही ग्लास बॉडी असून ज्याला अॅल्युमिनिअमच्या बॅक पॅनलसोबत रिप्लेस केल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या ग्लास बॉडीसोबतच अशी देखील चर्चा आहे की, आगामी येणारे iPhone चे ३ मॉडेलला वायरलेस चार्जिंग सपोर्टर असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लिक झालेल्या या मॉडेलचा लूक अतिशय सुंदर असून त्याला मेटल लूक देण्यात आला आहे. या iPhone 7s Plus मध्ये ड्युअल कॅमेरा असून अॅपलचा लोगो सेंटरमध्ये देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रिपोर्टमध्ये आलेल्या माहितीनुसार iPhone 7s Plus मध्ये पाणी आणि धुळीपासून रक्षण करण्याची ताकद असून या स्मार्टफोनला IP68 चं सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. 



त्याचप्रमाणे आता आलेल्या माहितीनुसार iPhone आता नव्या तीन कॉन्फिग्रेशनमध्ये येणार आहे. ज्यामध्ये दोन एलसीडी डिस्प्ले, एक ओएलइडी डिस्प्ले देण्यात येणार आहे. यामुळे हा स्मार्टफोनचा लूक अधिकच भारदस्त असणार आहे. हा नवा स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे.