नवी दिल्ली : अॅप्पलनं नुकतेच आपले 'आयफोन ८' आणि 'आयफोन ८ प्लस' हे दोन फोन लॉन्च केलेत. हे दोन्हीही फोन गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या 'आयफोन ७' आणि 'आयफोन ७ प्लस' या फोनचे अपग्रेडेट वर्जन आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला जर जास्तीत जास्त काळ टिकून राहणारी बॅटरी असलेला फोन विकत घ्यायचा असेल तर आयफोन ८ नाही तर 'आयफोन ७' हा फोनचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. कारण 'आयफोन ७' सीरिजची बॅटरी 'आयफोन ८' सिरीजच्या फोनपेक्षा उत्तम आहे.


'आयफोन ८'मध्ये १८२१mAH ची बॅटरी दिली गेलीय तर 'आयफोन ७'मध्ये १,९६० mAH बॅटरी आहे. 


तसंच 'आयफोन ८ प्लस'मध्ये २६७५ mAH ची बॅटरी आहे तर 'आयफोन ७ प्लस'मध्ये २९०० mAHची बॅटरी देण्यात आलीय. 


अर्थातच अपग्रेडेट वर्जन असूनही आयफोनच्या जुन्या फोनची बॅटरी नवीन फोनपेक्षा चांगली असल्याचंच दिसतंय. 


दरम्यान, आयफोन ८ ची बॅटरी आयफोन ७ प्रमाणेच बॅकअप देईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.