नवी दिल्ली : आयफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.


...म्हणून आयफोन घेणं टाळतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्युअल सिम नसल्यामुळे युजर्स आयफोन घेणं टाळतात असं समोर आलं आहे. त्यानंतर कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.


दमदार फिचर्समुळे प्रेमात


दमदार फिचर्समुळे भलेही युजर्स आयफोनच्या प्रेमात पडतात. मात्र, फोनमध्ये ड्युअल सिमकार्ड नसल्याने अनेकदा युजर्स नाराज होतात. पण आता युजर्ससाठी चांगली बातमी आली आहे.


लवकरच ड्युअल सिम


प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयफोनच्या नव्या मॉडल्समध्ये लवकरच ड्युअल सिमची सुविधा दिली जाणार आहे.


प्रसिद्ध विश्लेषक मिंग-ची कुओने आपल्या नोटमध्ये लिहीलं आहे की, २०१८मध्ये येणाऱ्या आयफोनच्या सर्व मॉडल्समध्ये ड्युअल सिम फिचर असणार आहे.


असंही म्हटलं जात आहे की, ड्युअल सिम LTE+LTE कनेक्टिव्हीटीसोबत नवा आयफोन येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ड्युअल सिम असलेल्या फोन्समध्ये LTE+3G कनेक्टिव्हीटी असते.


२०१८ मध्ये बाजारात येणाऱ्या आयफोनमध्ये LTE ट्रान्समिशन स्पीडोबतच ड्युअल स्टॅण्डबाय फिचरही देण्यात येणार असल्याचं कुओने आपल्या नोटमध्ये म्हटलं आहे.