अॅपलचा आयफोन ६ सेलमध्ये ६,५०० रुपयांत
अॅपलचा आयफोन ६ सेलमध्ये केवळ ६,५०० रुपयांत मिळत आहेत.
मुंबई : सध्या ई-कॉमर्स बाजारात सेलचा धमाका पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत अनेक वस्तू खरेदी करायला मिळत आहेत. फ्लिपकार्टवर अॅपलचा आयफोन ६ सेलमध्ये केवळ ६,५०० रुपयांत मिळत आहेत.
ऑनलाईन कंपनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वर सेल सुरु आहे. यावर विविध ऑफर्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अॅपलचा आयफोन ६ सेलमध्ये केवळ ६ हजार ५०० रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ फ्लिपकार्टवर घेता येईल. ही ऑफर आयफोन ६ च्या ३२जीबी व्हेरियंटवर असून ग्राहकांना हा फोन ३६६७ रुपये प्रतिमहिना नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करण्याचीही ऑफर देण्यात आली आहे. त्याचबरोबर ७३१ रुपये प्रतिमहिना भरुनही हा फोन खरेदी करता येऊ शकतो.
तसेच या फोनवर १५ हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर कंपनीकडून दिली जात आहे. म्हणजे तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन घेतल्यास १५ हजार रुपयांची सूट मिळेल. पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाली तर फोनची किंमत कमी होवून केवळ ६ हजार ९९९ रुपये होईल. याशिवाय तुम्ही एसबीआयच्या कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट आणि अजून ७०० रुपये डिस्काउंट मिळून हा फोन केवळ ६ हजार ५०० रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे.