नवी दिल्ली : मोबाईल कंपनी Asus ने भारतामध्ये आपला नवा आणि दमदार 'झेनफोन झूम एस' (ZenFone Zoom S) हा स्मार्टफोन लाँच केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झेनफोन झूम एस' या स्मार्टफोनची किंमत २६,९९९ रुपये असून कंपनीने हा फोन वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या मुहूर्तावर लाँच केलं आहे. 


१९ ऑगस्ट रोजी वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो. यापूर्वी दोन दिवस आधी हा फोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन केवळ ई-कॉमर्स वेबसाईट असलेल्या फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे.


या स्मार्टफोनसोबतसोबतच भारतीय बाजारपेठेत आणखीन एक ड्यूअल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची एन्ट्री झाली आहे. हा स्मार्टफोन नेव्ही ब्लू आणि ग्लेशियर सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. 


५.५ इंच फूल एचडी एमोलेड डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये २GHz क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ४जीबी रॅमसोबत ६४जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. एक्सटरनल मेमरी २ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.