Ather ने लॉन्च केली नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर; Ola S1 ला टक्कर, जाणून घ्या किंमत
Ather 450S Launch : Ather ने त्याची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर 450S लॉन्च केली आहे. या स्कूटरसाठी बुकिंग वेटिंग होती. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर कधी बाजारात येणार याची मोठी उत्सुकता होती.
Ather 450S Launch : पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढल्याने आता अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक बाईकलाही सध्या मागणी वाढली आहे. Ather ने आपली एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर 450S लाँन्च केली आहे ज्याची सुरुवातीची किंमत 1.30 लाख रुपये आहे.
Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 प्रतिस्पर्धी असणार आहे. Ather 450S चे बुकिंग जुलैमध्ये सुरु होईल. बाजारात त्याची स्पर्धा Ola S1 शी असणार असल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे. Ather नवीन 450S बद्दल ससस्पेन ठेवला असून नवीन जास्त माहिती सामायिक केलेली नाही. कंपनीने उघड केलेल्या माहितीच्या आधारे, 450S मध्ये 3kWh बॅटरी पॅक असेल, जो 450X पेक्षा लहान आहे. कारण 450X ला 3.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी मिळते.
या व्हेरिएंटमध्ये 450S एका चार्जवर 115 किमीची रेंज देईल. त्याची श्रेणी 115km पेक्षा कमी असेल कारण 450X ची प्रमाणित श्रेणी देखील 146km आहे. परंतु वास्तविक श्रेणी फक्त 105km आहे. जरी 450S ची श्रेणी 450X पेक्षा 20 टक्के कमी असली तरी तिचा वेग 90 kmph आहे. एथरने अद्याप 0-40 किमी प्रतितास वेगाचे आकडे उघड केलेले नाहीत. यात 450X वेरिएंटपेक्षा कमी फीचर्स असतील.
Ather 450X च्या किमतीत वाढ
याशिवाय, अलीकडे Ather ने आपल्या 450X च्या किमती देखील वाढवल्या आहेत. 450X ची किंमत आता 1,45,000 रुपये (बंगळुरुमध्ये) आहे तर प्रो पॅकसह 450X 8,000 रुपयांनी वाढली असून ती 1,65,435 रुपये (बंगळुरुमध्ये) झाली आहे. Ather Energy च्या वतीने सांगण्यात आले की, सुधारित FAME-2 अनुदान गुरुवारपासून (1 जून) लागू केले जात आहे आणि यासोबतच त्यांनी आपल्या स्कूटरच्या किमती वाढवल्या आहेत.