मुंबई : ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये डिस्काऊंटचा पाऊस पडत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील दिग्गज कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या मॉडेल्सवर भरपूर सूट दिली आहे. मारूती सुझुकी, ह्युंडई, होंडा सारख्या कार कंपन्यांच्या बुकिंगवर मोठी सूट देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये डिस्काऊंटसोबतच स्वस्त इंश्युरन्स स्कीम, एक्सचेंज ऑफर आणि वॉरंटी स्किमचा देखील सहभाग आहे. टाटा मोटर्सने लकी ड्रॉच्या ऑफर देखील सादर केल्या आहेत. ज्यामध्ये 1 लाख रुपये जिंकण्याची भरपूर संधी 


मारूती सुझुकी 



देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीकडून डिलरशिप लेवलवर डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर नवरात्रीसाठी असणार आहे. 


या कारला मिळणार सूट 


ऑल्‍टो 800: 25 हजार रुपए तक
ऑल्‍टो K10: 17 हजार रुपये
वैगनआर: 22 हजार ते 30 हजार रुपये
सेलेरि‍ओ: 20 हजार रुपये
अर्टि‍गा: 20 हजार रुपये


टाटा मोटर्स 



टाटा मोटर्सने मार्च महिन्यात वेगवेगळ्या कारवर डिस्काऊंट ऑफर दिली आहे ग्राहक फक्त 1 रुपयाच्या इंश्युरन्स घेऊन या डिस्काऊंटचा फायदा घेऊ शकतात. यासोबतच कंपनीने लक्की कस्टमर्ससाठी 1 लाख रुपयाची रक्कम जिंकण्याची देखील संधी दिली आहे. 


या कारवर मिळणार सूट 


टाटा हैक्‍सा: 1 लाख रुपयांवर सूट
टाटा सफारी: 80 हजार  रुपयांवर सूट
टाटा जेस्‍ट: 65 हजार  रुपयांवर सूट
टाटा टि‍गोर: 32 हजार  रुपयांवर सूट
टाटा टि‍आगो: 28 हजार  रुपयांवर सूट



ह्युंडाई कारवर ऑफर 


देशातील सर्वात दुसरी मोठी कार कंपनी ह्युंडाईकडून मेगा मार्च मेगा सेव्हिंग अशी कॅम्पेन ऑफर सुरू आहे. या ऑफरच्या अंतर्गत कंपनीने जवळपास 75 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. कंपनीने यासोबत 3 वर्षाची गॅरंटी दिली असून 3 वर्षाची रोड साइड असिस्टेंस देखील दिली आहे. 


या कारवर मिळणार ऑफर 


ईयॉन: 45 हजार रुपये 
न्‍यू ग्रैंड आई10: पेट्रोल वर्जनवर 65 हजार रुपये, डीजल वर्जनवर 75 हजार रुपयांपर्यंत सूट 
एक्‍सेंट: 55 हजार रुपये
आई20 एक्‍टि‍व: 40 हजार रुपये
इलेन्‍ट्रा: 30 हजार रुपये (एक्‍सचेंज बोनस)
टुंसा: 30 हजार रुपये (एक्‍सचेंज बोनस)



होंडा कार 


होंडा कारने आपल्या 20 व्या वर्षपूर्तीवर स्वस्त इंश्युरन्स, एक्सचेंज बोनस, बेनेफिट्स आणि डिस्काऊंट सारखे आकर्षक ऑफर दिले आहेत. ही ऑफर 31 मार्चपर्यंत असणार आहे. 


या गाडीवर मिळणार सूट 


ब्रायो: 21,200 रुपये
अमेज: 40 हजार रुपये
जैज: 57 हजार रुपये
होंडा सि‍टी: 32 हजार रुपये
डब्‍ल्‍यूआर-वी: 12 हजार रुपये
बीआर-वी: 60 हजार रुपये
सीआर-वी: 1.50 लाख रुपये



निसान कार 


निसान कार देखील आपल्या गाड्यांवर ऑफर देत आहे. कंपनीकडून मिळणाऱ्या या बेनेफिट्समध्ये इंश्युरन्ससोबतच एक्सेसरीज देखील देण्यात येणार आहे. कंपनीकडून 7.99 टक्के व्याजर दर कार फायनॅन्स ऑप्शन देण्यात येणार आहे. 


या कारवर मिळणार सूट


माइक्रा: 43 हजार रुपये
टेरेनो: 72 हजार रुपये
सन्‍नी: 60 हजार रुपये