Auto Expo 2023 : ऑटो एक्स्पो 2023 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून एकापेक्षा एक सरस गाड्या सादर केल्या जात आहे. यामध्ये लॉजीस्टिक आणि कार्गो मोबिलिटीसाठी TATA Motors ची पॅव्हेलियन प्रतिष्ठित ऑटो एक्‍स्‍पो 2023 मध्‍ये टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या ऑटो व मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स कंपनीने आज वैयक्तिक, गतीशीलता, पीपल मोबिलिटी व कार्गो परिवहनामध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या सुरक्षित, स्‍मार्टर व हरित वाहने व संकल्‍पनांच्‍या त्‍यांच्‍या फ्यूचर रेडी श्रेणीचे अनावरण केले. अभियांत्रिकी व नवोन्‍मेष्‍काराच्‍या मुलभूत क्षमता, ‘मेड इन इंडिया’प्रती व्‍यापक आवडीला पुढे घेऊन जात आणि मानव-केंद्रित, हाय-टेक दृष्‍टीकोनाचा अवलंब करत टाटा मोटर्स ग्राहकांना सर्वांगीण सोल्‍यूशन्‍स व संपन्‍न अनुभव देण्‍याच्‍या माध्‍यमातून भारताला नवीन नवोन्‍मेष्‍कारांच्‍या दिशेने घेऊन जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा मोटर्स पॅव्हिलियनचे उद्घाटन करत आणि आपल्‍या वाहने, संकल्‍पना व सोल्‍यूशन्‍सच्‍या व्‍यापक श्रेणीचे अनावरण करत टाटा सन्‍सचे कार्यकारी अध्‍यक्ष आणि टाटा मोटर्सचे अध्‍यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्‍हणाले, ‘‘आम्‍ही आमच्‍या प्रत्‍येक व्‍यवसायामधील स्थिरता, ऊर्जा परिवर्तन आणि डिजिटलायझेशन केंद्रित परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहोत. शून्‍य उत्‍सर्जन पॉवरट्रेन्‍स, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत डिझाइन रचना आणि दर्जात्‍मक सेवांवर भर देण्‍यासह टाटा मोटर्स शाश्‍वत गतीशीलता आणि ‘निव्‍वळ शून्‍य’ कार्बन उत्‍सर्जन ध्‍येयांच्‍या अवलंबतेला गती देत आहे. 


ऑटो एक्‍स्‍पो 2023 मध्‍ये आम्‍हाला भविष्‍याप्रती आमचा दृष्‍टीकोन, तसेच आमची आधुनिक वाहने, संकल्‍पना व स्‍मार्ट मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून या दृष्‍टीकोनाच्‍या प्रकटीकरणाला सादर करण्‍याचा अभिमान वाटतो.’’ ऑटो एक्‍स्‍पो 2023 मध्‍ये लोक व कार्गो मोबिलिटीसाठी वाहने, संकल्‍पना व सोल्‍यूशन्‍सच्‍या व्‍यापक प्रदर्शनासह टाटा मोटर्स उभारत्‍या भारताच्‍या सर्वसमावेशक गतीशीलता गरजांची सर्वांगीणपणे पूर्तता करण्‍यासाठी त्‍यांचे नेतृत्‍व, कटिबद्धता व भविष्‍याकरिता सुसज्‍जता दाखवत आहे.  



ऑटो एक्‍स्‍पो २०२३ मध्‍ये टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहन प्रदर्शनाची वैशिष्‍ट्ये
टाटा मोटर्सची व्‍यावसायिक वाहन व्‍यवसायासााठी 2045 पर्यंत निव्‍वळ-शून्‍य उत्‍सर्जन संपादित करण्‍याची महत्त्वाकांक्षा  
भारतातील लॉजिस्टिकस व मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सच्‍या ग्रीनेस्‍ट, स्‍मार्टेस्‍ट व सर्वात प्रगत श्रेणीला सादर करणाऱ्या १४ विशेष वेईकल्‍स व संकल्‍पनांचे अनावरण  
भारतात पहिल्‍यांदाच: नैसर्गिक वायू, इलेक्ट्रिक व हायड्रोजनची शक्‍ती असलेल्‍या सीव्‍ही विभागांमध्‍ये हरित सस्‍टेनेबल लॉजिस्टिक्‍स व मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सची सर्वात सर्वसमावेशक श्रेणी  


शोस्‍टॉपर: लांब अंतरापर्यंतच्‍या ट्रकिंगसाठी डिकार्बनायझेशन पाथवे संकल्‍पनेसोबत प्राइमा श्रेणीमध्‍ये एकीकृत करण्‍यात आलेले ४ सुस्‍पष्‍ट प्रोपल्‍शन तंत्रज्ञान: हायड्रोजन आयसीई, हायड्रोजन फ्यूएल सेल ईव्‍ही, बॅटरी ईव्‍ही आणि एलएनजीचे प्रदर्शन  
 अद्वितीय हायड्रोजन प्रोपल्‍शन संकल्‍पना:
स्‍टारबस फ्यूएल सेल ईव्‍ही – व्‍यावसायिक उपयोजनासाठी भारतातील पहिली हायड्रोजन फ्यूएल सेल बस  
प्राइमा ई.५५एस – भारतातील पहिली हायड्रोजन फ्यूएल सेल पॉवर्ड ट्रॅक्‍टर कन्‍सेप्‍ट  
प्राइमा एच.५५एस – भारतातील पहिला हायड्रोजन आयसीई पॉवर्ड कन्‍सेप्‍ट ट्रक  
अनावरण:
सिग्‍ना (२८ ते ५५ टी रेंज), एचअॅण्‍डएचसीव्‍ही विभागसाठी न्‍यू जनरेशन, ऑल-एनर्जी आर्किटेक्‍चर व मॉडर्न केबिनचा समावेश  
अझुरा (७ ते १९टी रेंज), आयअॅण्‍डएलसीव्‍ही विभागासाठी न्‍यू जनरेशन आर्किटेक्‍चरसह नवीन एक्‍स्‍टीरिअर्स व इंटीरिअर्सचा समावेश  
अल्‍ट्रा ई.९ – आंतरशहरीय उच्‍च क्षमतेच्‍या शहरी कार्गो परिवहनासाठी शून्‍य उत्‍सर्जन, स्‍मार्ट लॉजिस्टिक्‍स सिटी ट्रक  
मॅजिक ईव्‍ही – भारातील लोकप्रिय लास्‍ट-माइल प्रवासी परिवहनासाठी इलेक्ट्रिफाईड व्‍हर्जन  
प्राइमा ई.२८के – खाणकाम व बंदिस्‍त जागेमधील उपयोजनांसाठी शून्‍य उत्‍सर्जन वैविध्‍यपूर्ण टिपर कन्‍सेप्‍ट  


एस ईव्‍ही – शून्‍य उत्‍सर्जन लास्‍ट माइल डिस्ट्रिब्‍युशन स्‍मॉल कमर्शियल वेईकल
 स्‍टारबस ईव्‍ही – अत्‍याधुनिक, शून्‍य उत्‍सर्जन, शहरी सार्वजनिक परिवहन सोल्‍यूशन  


 योधा सीएनजी व इन्‍ट्रा व्‍ही२० बायफ्यूएल (लॉंग रेंज) – नवीन सीएनजी पॉवर्ड पिक-अप्‍स  
 प्राइमा जी.३५के – हेवी ड्युटी उपयोजनांसाठी भारतातील पहिला एलएनजी टिपर  
विंगर: लोकप्रिय विंगरच्‍या प्रिमिअम व्‍हर्जनसह लक्‍झरीअस इंटीरिअर्स, जे राइड कम्‍फर्टला पुनर्परिभाषित करतात  
प्रदर्शन: स्‍मार्ट डिजिटल व कनेक्‍टेड वेईकल ऑफरिंग्‍ज: ई-दुकान, फ्लीट एज आणि फ्लीट मॅनेजमेंट सोल्‍यूशन  


व्‍यावसायिक वाहन पैलूसंदर्भात भावी गतीशीलतेबाबत बोलताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, ‘‘आम्‍ही भारतातील शाश्वत, कनेक्टेड आणि सुरक्षित गतीशीलतेच्या जागतिक मेगाट्रेंडचे नेतृत्व करत आहोत. २०४५ पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या आमच्या ध्येयासह आम्ही आमचा संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ, मूल्य साखळी आणि ऑपरेशन्सची पुनर्कल्पना करून गतीशीलतेमध्ये परिवर्तन करत आहोत. आज, आम्ही व्यावसायिक वाहनांच्या सर्व विभागांमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ, स्मार्ट व सर्वात प्रगत लॉजिस्टिक आणि मास मोबिलिटी सोल्यूशन्सचे अनावरण केले आहे. अत्याधुनिक प्रोपल्शन तंत्रज्ञानाच्या आधारे आम्ही प्रत्येक विभागात अनेक हरित इंधन पर्याय - नैसर्गिक वायू, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन ऑफर करण्यासाठी अद्वितीयरित्‍या स्थित आहोत. शून्य उत्सर्जन तंत्रज्ञानाप्रती आमची वचनबद्धता व सक्रिय कृती ग्राहकांना अल्‍प व दीर्घ कालावधीसाठी स्वच्छ आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य मोबिलिटी सोल्यूशन्सकडे उत्तरोत्तर व अखंडपणे संक्रमण करण्यास सक्षम करेल.’’


ऑटो एक्‍स्‍पो २०२३ मध्‍ये टाटा मोटर्स प्रवासी व इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनाची वैशिष्‍ट्ये:
टाटा मोटर्सची प्रवासी वाहन व्‍यवसायासााठी २०४० पर्यंत निव्‍वळ-शून्‍य उत्‍सर्जन संपादित करण्‍याची महत्त्वाकांक्षा  
भारतातील वैयक्तिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍सची सर्वोत्तम डिझाइन केलेल्‍या, स्‍मार्टेस्‍ट व ग्रीनेस्‍ट श्रेणीच्‍या १२ वेईकल्‍स व संकल्‍पनांचे अनावरण  
शोस्‍टॉपर: सिएरा.ईव्‍ही, मुलभूतरित्‍या ‘ह्युमन एक्‍स्‍पेरिअन्‍स’सह निर्माण केलेली शाश्‍वत डिझाइन
भारतात पहिल्‍यांदाच: ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह इलेक्ट्रिक एसयूव्‍ही, हॅरियर.ईव्‍ही, जनरेशन २ आर्किटेक्‍चरवर विकसित करण्‍यात आलेली आकर्षक, शक्तिशाली, इंटेलिजण्‍ट वेईकल  
सार्वजनिक पदार्पण: अविन्‍य कन्‍सेप्‍ट, जनरेशन ३ आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आलेल्‍या प्‍युअर इलेक्ट्रिक वेईकलची अभिव्‍यक्‍ती –गतीशीलतेची नवीन टायपोलॉजी सादर, जी एैसपैस जागा व आरामदायीपणाची खात्री देते.  


कन्‍सपेट कर्व्‍हचे आयसीई व्‍हर्जन, एसूयव्‍हीच्‍या प्रबळ आकर्षततेचा समावेश असण्‍यासह आकर्षकता, कार्यक्षमता व व्‍यावहारिकतेचे परिपूर्ण संतुलन  सीएनजी विभागामध्‍ये धुमाकूळ: अल्‍ट्रोज आयसीएनजी व पंच आयसीएनजीमध्‍ये संपूर्ण बूट क्षमता – क्रांतिकारी ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञान अधिक एैसपैस जागा व कार्यक्षमता देते. परफॉर्मन्‍स उत्‍साहींसाठी: अल्‍ट्रोज रेसर आणि टियागो.ईव्‍हीच्‍या स्‍पोर्टी व्‍हर्जनसह पल्‍स रेसिंगचा अनुभव घ्‍या, तसेच दमदार ऑन-रोड उपस्थितीसह या अवतारांचा ड्राइव्‍ह करण्‍याचा आनंद घ्‍या.    


प्रवासी वाहन पैलूसंदर्भात भावी गतीशीलतेबाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ‘‘प्रवासी वाहन व्यवसाय भारताला सतत पुढे नेण्यासाठी नवकल्पना आणि धुमाकूळ निर्माण करण्यावर केंद्रित आहे. आमच्या ‘न्यू फॉरएव्हर’ तत्त्वासह आम्ही झपाट्याने विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या गरजा आणि जीवनशैलीच्या अनुषंगाने आमचा पोर्टफोलिओ गती व चपळतेसह रिफ्रेश व अपग्रेड केला आहे. अधिक स्मार्ट आणि सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही भारत केंद्रित, आधुनिक वैयक्तिक गतिशीलता सोल्‍यूशन्‍स तयार करत आहोत. कमी उत्सर्जन आणि उत्कृष्ट कामगिरी देण्यासाठी आम्ही जागतिक दर्जाच्या पॉवरट्रेनमध्ये गुंतवणूक करत आहोत. आज, आम्ही सीएनजीमध्ये डिझाइन नवकल्पनांचे अनावरण करत आहोत, जे प्रस्थापित नियमांमध्‍ये व्‍यत्‍यय आणतील आणि महत्वाकांक्षी भारतीयांसाठी त्याच्या आयसीई अवतारात कर्व्‍ह या संकल्पनेसह आधुनिक बॉडी-स्‍टाइल्‍स सादर करत आहोत.  


कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी त्‍वरित सहयोगी कृतीची मागणी करणाऱ्या भविष्यातील हरित आदेशाकडे आम्ही वाटचाल करत आहोत. २०४० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या थ्री-जनरेशन ईव्ही आर्किटेक्चर धोरणाच्या आधारे या मोहिमेचे नेतृत्व करत आहोत. टियागो.ईव्‍हीसह आम्ही ईवही अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देत बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण केली आहे. आज, आम्‍ही अविन्‍य, हॅरियर.ईव्‍ही आणि आमची शोस्‍टॉपर-सिएरा.ईव्‍ही सह जनरेशन २ व जनरेशन ३ आर्किटेक्‍चरमधील उत्पादनांचे अनावरण केले आहे, जे ईव्‍हीला अधिक महत्त्वाकांक्षी बनवेल. आमच्या पोर्टफोलिओमधील ईव्‍ही योगदान ५ वर्षांत २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याची आणि २०३० पर्यंत ५० टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.’’