नवी दिल्ली : ऑटो एक्‍सपोच्या पहिल्या दिवशी देशातील सर्वात मोठ्या टू-व्‍हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी ३ मॉडल्स सादर केले. यात २ स्कूटर आणि १ बाईक आहे. कंपनीने Duet 125 आणि Maestro Edge 125 या दोन स्कूटर्स लॉन्च केल्या. तर २०० सीसी ची Xpulse बाईक शोकेस केल्या.


125cc च्या दोन स्कूटर्स लॉन्च


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Duet 125 आणि Maestro Edge 12 या दोन्ही स्कूटर्स 125cc च्या आहेत. दोन्ही स्कूटरमध्ये i3S इंजिन वापरले आहे. दोन्हीही 8.5 bhp पॉवरच्या आणि 10 Nm  चे  टार्क  देतात. स्मार्ट स्कूटर्समध्ये LED टेलाइलट, analog-digital console, Mobile charging, telescopic forks, alloy wheels या सुविधांचा समावेश केला आहे


Hero Xpulse केली शोकेस


कंपनीने नवी बाईक Hero Xpulse शोकेस केली. २०० सीसी रेंजची ही बाईक इम्‍पल्‍स बाईकचे अपग्रेड व्हर्जन आहे. हे यंग बाईकर्स आणि अॅडव्हेंचरची आवड असलेल्या लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.


दमदार फिचर्स


  • 190 mm सस्‍पेंशन ट्रॅव्हल

  • 170 mm रियर ट्रॅव्हल

  • 18-inch रियर टायर

  • 220 mm ग्राऊंड क्लियरेंस

  • 825 mm सीट हाईट

  • Full LED हॅडलॅंप