नोकरदार वर्गासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत `या` CNG कार; जबरदस्त किंमत अन् फिचर पाहाच

Auto News : नोकरीवर वेळेत पोहोचण्यासाठी कार पुलिंग कमाल उपाय... पेट्रोल डिझेलच्या किमती आता तुमच्या अडचणी वाढवणार नाहीत.
Auto News : नोकरीच्या ठिकाणी, अर्थात ऑफिसात पोहोचण्यासाठी दर दिवशी असंख्य मंडळी थकवा आणणारा प्रवास करतात. रेल्वे, बस, रिक्षा, कॅब... बरं हे सारं करूनही अनेकांना पायपीट काही चुकलेली नाही. अशा वेळी, आपली स्वत:ची कार असती तर किती बरं झालं असतं? असा विचारही अनेकांच्या मनात येतो. पण, मत पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चाचा विचार करता लगेचच तोसुद्धा दूर लोटला जातो.
आता मात्र ऑफिस आणि दैनंदिन प्रवासाच्या हिशोबानं कार खरेदी करण्याचं स्वप्न खुशाल पाहा आणि ते पूर्णही करा. कारण, आता इंधनाच्या खर्चाची चिंता नसेल. हे शक्य होतंय ते म्हणजे एकाहून एक दमदार परफॉरमन्स देणाऱ्या 'या' CNG कारमुळं.
मारुती सुझूकी बलेनो (Maruti Suzuki Baleno CNG)
मारुती सुझूकी बलेनो या कारच्या पेट्रोल मॉडेलसह आता सीएनजी मॉडेलही कारप्रेमींच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टाईल आणि मायलेजच्या बाबतीतसुद्धा ही कार कमाल असून, तिची किंमत आहे 9.23 लाख ते 9.41 लाख रुपये.
मारुती सुझूकी डिझायर (Maruti Suzuki Dzire CNG)
₹8.39 लाख - ₹9.07 लाख इतक्या किमतीत उपलब्ध असणारी ही एक उत्तम सेडान कार आहे. ही कार 31.12 km/kg इतकं मायलेज देते. लो मेंटेनन्स आणि कमाल रिसेल वॅल्यू यासाठीसुद्धा तुम्ही ही कार निवडू शकता.
टाटा अल्ट्रोज (Tata Altroz CNG)
भक्कमपणासाठी ओळखल्या टाटाच्या कारमध्ये येणारं एक लोकप्रिय नाव म्हणजे अल्ट्रोज. या कारच्या सीएनजी मॉडेलला 5 स्टार रेटिंग मिळाली असून, कारची किंमत 8.85 लाख आणि 10.55 लाख रुपयांदरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे. ही कार 26.2KM/ Kg इतकं मायलेज देते.
टोयोटा ग्लॅन्जा (Toyota Glanza CNG)
बलेनोसाठी पर्याय शोधत असाल तर, टोयोटाची ग्लॅन्जा ही कार एक उत्तम पर्याय ठरते. या कारची किंमत ₹8.63 लाख - ₹9.66 लाख रुपयांदरम्यान असून, यामध्ये अनेक अॅडवान्स फिचर्स उपलब्ध आहेत.
हेसुद्धा वाचा : पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ! बुलढाण्यात जगातील सर्वात दुर्मिळ घटना, डॉक्टरही चक्रावले
ह्युंडई ऑरा (Hyundai Aura CNG)
सीएनडी कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी ह्युंडई ऑरा ही कार एक चांगला पर्याय ठरते. या कारची किंमत ₹8.44 लाख - ₹9.05 लाखांदरम्यान असून, ही कार 28 km/kg इतकं मायलेज देते. या कारमध्ये 402 लीटरचा बूट स्पेसही मिळतो.