दिग्गज स्मार्टफोन कंपनी Xiaomi आणणार आपली EV कार! जाणून घ्या कधी सुरू होणार प्रोडक्शन
आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेक्टरमध्ये आणखी एक मोठी कंपनी उतरणार आहे
मुंबई : आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेक्टरमध्ये आणखी एक मोठी कंपनी उतरणार आहे. नुकतेच iPhone बनवणारी कंपनी Foxconn ने EV कार लॉंच केली आहे. आता चिनी दिग्गज स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi Corp सुद्धा EV कार निर्मिती करण्याच्या तयारीत आहे.
प्रोडक्शन सुरू होणार
Xiaomi CORP चे मुख्य कार्यकारी लेई जून यांनी म्हटले की, 2024 च्या पहिल्या काही महिन्यात आपल्या इलेक्ट्रिक कारांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार आहे. Xiaomi चे इंटरनॅशनल मार्केटिंग डिपार्टमेंटचे जॅंग जियुआनने देखील आपल्या वेरिफाइड वीबो अकाउंटवर या बातमीला पोस्ट केले आहे.
कंपनीतर्फे पुढील टार्गेट नवीन EV डिविजन लॉंचिंगचे असणार आहे. या बाबतीत Xiaomi तर्फे वर्षाच्या सुरूवातीला घोषणा करण्यात येईल. या माहितीमुळे Xiaomi चे शेअर 5.4 टक्क्यांनी वधारले आहेत.
मार्चमध्ये Xiaomiने म्हटले की, पुढील दहा वर्षात इलेक्ट्रिक कार डिविजनमध्ये $ 10 बिलियनची गुंतवणूक करण्यासाठी प्रतिबद्ध असणार आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये आपल्या EV युनिटच्या व्यवसायाचे रेजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे.