मुंबई : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनी (Honda Motorcycle & Scooter India) भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, आगामी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Activa पेक्षा कमी असू शकते. याशिवाय कंपनी आणखी दोन मॉडेल्स लाँच करू शकते. होंडाचं या दशकाच्या अखेरपर्यंत 10 लाख इलेक्ट्रिक गाड्या विकण्याचं लक्ष्य आहे. यासाठी कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटरचा अभ्यास पूर्ण केला आहे. आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रति तास असू शकतो. (automobile company honda activa electric scooter may launch 2023 know all features)


ताशी 60 किमी धावणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानी कंपनी स्थानिक उत्पादन क्षमता मजबूत करण्यासाठी पुरवठा साखळी भागीदारांसोबत काम करत आहे. कंपनी भारतातच वाहनं तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवरून घटक एकत्रित करेल. ही सर्व माहिती कंपनीचे अध्यक्ष अत्सुशी ओगाटा यांनी दिली आहे. अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटरच्या लॉन्चची वेळ आणि रेंजसंबंधित माहिती समोर आलेली नाही. पण अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड प्रतितास 60 किलोमीटर (60 kmph)  असू शकतो.


Activa पेक्षा स्वस्त e-Scooter


Honda च्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत Activa पेक्षा कमी असू शकते. याचा अर्थ नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 72,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. Honda ही इलेक्ट्रिक स्कूटर पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लॉन्च करू शकते. होंडाची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर कंपनी आणि ओला इलेक्ट्रिक आणि एथर एनर्जी सारख्या स्टार्टअप कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.