मुंबई : प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रा लवकरच भारतात बोलेरोचा नवा अवतार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी स्पोर्ट यूटिलिटी व्हीकल (SUV) Mahindra Bolero Nio लवकरच बाजारात आणू शकते.  बोलेरोचा हा नवा अवतार TUV300 वर आधारित असून लवकरच भेटीला येणार आहे. (automobile company Mahindra is going launch Bolero Neo soon, know price and features)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनुसार, कंपनीने या नव्या एसयूवीमध्ये अनेक बदल केले आहेत.  कंपनीने TUV300 च्या तुलनेत Bolero Neo च्या फ्रंटमध्ये अनेक बदले केले गेले आहेत. यामध्ये री फ्रोफाईल्ड हायलाईट्स, 1 अपडेटेड ग्रिल, नवीन फ्रंट बंपर अन LED DRL लावण्यात आला आहे. 



या नव्या गाडीला क्लैम-शेल बोनेट प्रकारचं डिझाईन देण्यात आलं आहे. सोबतच साइड आणि रियर लुकमध्ये काहीशा मायनर अल्ट्रेशनशिवाय फार बदल करण्यात आलेले नाहीत.   


महिंद्रा बोलेरो नियोचं इंजिनबाबत म्हणायचं झालं  तर, यामध्ये TUV300 नुसार BS6 कम्पलायंट 1.5 लीटरचं थ्री सिलेंडर इंजिन देण्यात येऊ शकतं.  हे इंजिन 100 HP इतकी पावर आणि 240Nm जनरेट करेल.  या इंजिनसह 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स असणार आहे. सोबतच फ्यूल सेव्हिंग, इंजिन स्टार्ट-स्टॉप फिचर दिलंम जाऊ शकतं. या  सर्व सुविधा पहिल्या TUV300 मध्ये देण्यात आला होता.  


2021 Mahindra Bolero Neo किमंत किती?


या एसयूवीची (2021 Mahindra Bolero Neo) एक्स प्राईज किमंत (ex showroom price) 9 ते 12 लाख दरम्यान असू शकते.