नवी दिल्ली : ४ जी मोबाइल दूरसंचार सेवांना स्वस्त दरात देऊन ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जिओने एक वाईट बातमीही दिली आहे. ४५९ रुपयांमध्ये ८४ दिवस वैधता असणाऱ्या लोकप्रिय प्लानमध्ये कंपनीने बदल केले असून याच्या किंमतीत १५ टक्के वाढ केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दर दिवसाला एक जीबी हाय स्पीड ४ जी डेटाची सुविधा देणार्या या प्लॅनच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. रु. १४९ रु प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन जीबीच्या जागी चार जीबी डेटा मिळेल. कंपनीने छोट्या प्लानवरील डेटा वाढवत प्लान टॅरिफही कमी केला आहे.


जिओने ५२ रुपयात एक आठवडा ९८ मध्ये दोन आठवडे चालणारा प्लान आणला आहे.
त्याअंतर्गत अनलिमिटेड कॉल-मेसेज-डेटा ग्राहकांना देण्यात येणार आहे. 
रोज ०.१५ जीबीचा हाय स्पीड डेटा दिला जाणार आहे. जिओच्या सर्व प्लानवर अनलिमिटेड कॉलची सुविधा सुरू राहणार आहे.


कंपनीने ५०९ रुपयांच्या प्लानमधल्या सुविधा कमी केल्या आहेत. या अंतर्गत ग्राहकांना दररोज दोन जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. कंपनीने आपली वॅलिडिटी ५६ दिवसांवरून ४९ दिवस कमी केली आहे. तसेच ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० जीबी डेटा ऐवजी ६० जीबी डेटा असा बदल होत आहे. त्याची वैधता ६० दिवस राहणार आहे.
जिओने १९९९ रुपयाचा प्लानही सुरू केला आहे. यामध्ये सहा महिने १२५ जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. ४९९९ रुपयाच्या प्लानची वैधता २१० दिवसांनी वाढवून एक वर्ष केली असून ३८० जीबी डेटा कमी करुन ३५० जीबी करण्यात आला आहे. 
३० सप्टेंबर पर्यंत जिओच्या ग्राहकांची संख्या १३.८६ कोटी इतकी झाली आहे.  या तमाहीत कंपनीला ३ कोटी नवे ग्राहक मिळाले आहेत. सप्टेंबर २०१७ च्या शेवटच्या तीन महिन्यांत २७०.५ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. जून तिमाहीत हे नुकसान २१.३ कोटी रुपये होते. कंपनीचे एकूण उत्पन्न ६,१४७ कोटी रुपये आहे.