बजाजने ७००० नी कमी केली या बाईकची किंमत...
बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
नवी दिल्ली : तुम्ही जर बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टू-व्हीलर कंपनी बजाजने आपल्या बाईकची किंमत सुमारे १०% कमी केली आहे. बजाजने एंट्री लेवल बाईक सीटी १०० (Bajaj CT 100) ची किंमत कमी केली आहे. आतापर्यंत सर्वात स्वस्त बाईक म्हणून टीव्हीएस एक्स एल १०० (TVS XL 100) ची ओळख होती. मात्र किंमत कमी केल्यानंतर Bajaj CT 100 सर्वात स्वस्त बाईक बनली आहे. बजाजच्या सीटी १०० चे सुरुवातीचे वेरिएंट दिल्लीमध्ये ३०,७१४ रुपयांना एक्स शोरुम प्राईजमध्ये मिळत आहे.
ही आहे किंमत
तर टीव्हीएस च्या XL 100 ची किंमत यापेक्षा सुमारे ५० रुपये अधिक आहे. ड्राईव्ह स्पार्कच्या वृत्तानुसार, किक स्टॉट आणि एलॉय व्हील असलेल्या बजाज सीटी १०० केएस (CT100 KS)ची किंमत ६,८३५ रुपयांपर्यंत कमी केली आहे. आता तुम्ही ही बाईक ३१,८०२ रुपयांच्या एक्स शोरुम प्राईजमध्ये दिल्लीत खरेदी करु शकता. सीटी १०० च्या इलेक्ट्रिक स्टार्ट आणि एलॉय व्हील असलेल्या टॉप वेरिएंटचे दिल्लीच्या एक्स शोरूम प्राईज ३९,८८५ रुपये आहे.
हे आहेत फिचर्स
यापूर्वी याची किंमत ४१,११४ रुपये होती. बजाजच्या CT100 मध्ये 99.27CC चे इंजिन दिले आहे. यात 4 स्पीड असलेला गिअर बॉक्स दिला आहे. याचे इंजिन 8.8bhp च्या पॉवर 8.05 न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करते. बजाज सीटी १०० च्या फ्रंट मध्ये टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि रिअरमध्ये स्प्रिंग इन स्प्रिंग शॉकर दिले आहे. याच्या फ्रंट आणि रिअर मध्ये 110mm चे ड्रम ब्रेक दिले आहेत. बजाजची ही सर्वात स्वस्त बाईक १ लीटर पेट्रोलमध्ये ९० किलोमीटरचा मायलेज देते. ही बाईक ग्रामीण आणि शहरी भागात लोकप्रिय आहे.
अजून एका जून्या बाईकचा नवा अवतार
बजाज आपली लोकप्रिय बाईक पल्सर नवीन अवतारात सादर करण्यास सज्ज आहे. पल्सरचे नवे मॉडल अलिकडेच टेस्टिंगदरम्यान स्पॉट करण्यात आले. 2018 Pulsar 150चे डिझाईन जून्या मॉडलच्या तुलनेत खूप बदललेले आहे.