मुंबई : देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. बजाज ऑटोने घेतलेल्या या निर्णयामुळे पल्सर बाईक प्रेमींना एक झटका बसण्याची शक्यता आहे. पाहूयात बजाज ऑटोने काय निर्णय घेतला आणि त्यामागे काय कारणं आहे.


बजाज कंपनीचा मोठा निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजाज कंपनीने पल्सर (Pulsar) गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता ग्राहकांना पल्सर 135 एलएस (Pulsar 135LS) आणि बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट 150) (Avenger Street 150) बाजारात उपलब्ध दिसणार नाहीयेत.


...म्हणून कंपनीने घेतला हा निर्णय


कंपनीने 135 सीसीच्या पल्सर गाडीच्या मागणीत घट झाल्याने कंपनीने प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पल्सरच्या 150 सीसी मॉडेलची विक्री खूपच चांगल्या पद्धतीने होत आहे.


पल्सर 150चं अपडेटेड मॉडल येणार 


पल्सर 150 या गाडीची विक्री खूपच चांगली होत असल्याने कंपनीने याचं अपडेटेड मॉडल लॉन्च करण्याची तयारी केली आहे. नव्या पल्सर 150 मध्ये फ्रँट आणि रियर साईडला डिस्क ब्रेक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच बाईकचा रियर टायर पूर्वीपेक्षा अधिक रुंद असणार आहे आणि याच्या सीटमध्येही बदल करण्यात येणार आहेत.


पल्सरच्या विक्रीत घसरण


135 CC असलेल्या पल्सरच्या विक्रीत घसरण झाल्याने कंपनीने प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बजाजच्या अधिकृत वेबसाईटवर अॅव्हेंजर स्ट्रीट 150 बाईकही लिस्टेड नाहीये. तसेच बजाज कंपनीतर्फेही घोषणा करण्यात आली आहे की, अॅव्हेंजर स्ट्रीट 150 बंद करण्यात आली नाहीये तर ही बाईक अॅव्हेंजर स्ट्रीट 180 मध्ये अपग्रेड करण्यात आली आहे. 150 सीसी अॅव्हेंजर मॉडेलला पूर्वीपेक्षा अधिक पावरफुल फिचर्ससह 180सीसी मॉडेलमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे.


अॅव्हेंजर स्ट्रीट 180 बाजारात


बजाजने काही दिवसांपूर्वी अॅव्हेंजर स्ट्रीट 180 लॉन्च केली होती. यामध्ये रोड्सटर डिझाइनची हेडलँम्प लावण्यात आली असून ही एलईडी लाईट आहे. बाईकवर देण्यात आलेले नवे ग्राफिक्स आणि ब्लॅक अलॉय व्हील्समुळे गाडीला एक स्पोर्टी लूक येतो. बजाजच्या या बाईकची एक्स शोरुम किंमत 83,475 रुपये आहे.