मुंबई : बाईकप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, बजाज ऑटोने आपली डिस्कवर रेंजची बाईक अपडेट करत लॉन्च केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी बजाजने आपली पल्सर सीरिजची बाईकही अपग्रेड करण्याची घोषणा केली होती. बजाज डिस्कवर १२५ बाईकमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत तर डिस्कवर ११० सीसी मॉडलही लॉन्च करण्यात येणार आहे.


इंटरनेटवर या नव्या मॉडलचे काही फोटोज समोर आले आहेत. गाडीची किंमत पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.


कम्प्यूटर सेगमेंटवर फोकस करत बजाज आपली लोकप्रिय बाईक डिस्कवरचं ११० सीसी मॉडल घेऊन आली आहे. भारतीय बाजारात या नव्या बाईकची टक्कर टीव्हीएस विक्टर, होंडा ड्रीम सीरिजची बाईक आणि हिरो पॅशन प्रो बाईक्ससोबत असणार आहे.


काय आहेत फिचर्स...


डिस्कवर ११० चा मायलेज खूपच चांगलं असल्याचं बोललं जात आहे. ब्लॅक अलॉय व्हिल्ज, इंजिन फ्रंट फोक्स असलेल्या या बाईकच्या टायर्सला डिस्क ब्रेक देण्यात आलेला नाहीये. ११० सीसीचं सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन असून ८.५ बीएचपी पॉवर देण्यात आलं आहे. ९ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. तसेच इंजिन ४ स्पीड गियरबॉक्स देण्यात आलं आहे.


किती आहे किंमत?


बजाज डिस्कवरच्या नव्या ११० सीसी मॉडलची एक्स शोरुम किंमत ४८,००० रुपये आहे. तर, डिस्कवर १२५ सीसी मॉडलची किंमत ५५,००० रुपये असणार. या दोन्ही बाईक्स लवकरच लॉन्च होणार आहेत.