Bajaj Platina 110 ABS Launched:  Bajaj Platina 110 ABS Launched: नवनवीन बाईकविषयी तरुणांईमध्ये नेहमीच क्रेझ पाहायला मिळते. तरुण वर्ग बाईक वरील फिचर्स जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सूक असतात. बाजारात एखादी नवीन बाईक आल्यास सगळ्यांना त्याच्या बारिकसारीर गोष्टी जाणून घेण्यात रस असतो. हल्ली बाईकची किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशात नवीन बाईक घेण्याचे स्वप्न तरुणांसाठी राहिले आहे. तुम्ही परवडणारी बाईक घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी बाजारात नवीन पर्याय आला आहे. बजाज ऑटोने (Bajaj Auto) भारतीय बाजारपेठेत Platina 110 ABS ही बाईक लॉन्च केली आहे. लॉन्च  झालेल्या बजाज प्लॅटिना 110 ABS बाईकची किंमत  72,224 रुपये इतकी आहे. तुम्हाला माहितेय का 110cc सेगमेंटमधील ही पहिली आणि एकमेव मोटरसायकल आहे जी ABS सह आली आहे. कपंनीने ग्राहकांच्या आवडीप्रमाणे बाईकचे 4 कलर ऑप्शन्स दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


इंजिन आणि गिअरबॉक्स


1. नवीन बजाज प्लॅटिना 110 ABS मध्ये 115.45cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. 


2. हे इंजिन 7,000 RPM वर 8.4 bhp पॉवर आणि 5,000 RPM वर 9.81 Nm पीक टॉर्क जनरेट करते. 


3. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. 


4. एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलॅम्प युनिट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 17-इंच चाके आणि 11-लिटर क्षमतेची इंधन टाकी मिळते.


 


Bajaj Platina 110 ABS ची वैशिष्ट्ये


1. बाईकला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स 


2. मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक ऍब्जॉर्बर्स


3. समोरील बाजूस सिंगल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) 


4. मागील बाजूस ड्रम ब्रेकसह डिस्क ब्रेक


5. बाईकला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर


6. गीअर पोझिशन, गियर गाईडन्स


7. ABS अलर्ट 


बाजारात आलेली बजाज प्लॅटिना ही बाईक भारतीय बाजारपेठेतील Hero Splendor Plus, Honda CD 110 Dream आणि TVS Star City Plus यांच्याशी स्पर्धा करते. प्लॅटिना ही कंपनीसाठी सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे.