प्रिया प्रकाशच्या नावाने व्हायरस, स्मार्टफोनला धोका
देश आणि विदेशातीलही अनेकांच्या हृदयावर राज करणाऱ्या या मुलीचे तुम्हीही फॅन झाला असाल तर सावधान..! या मुलीच्या नावे किंवा फोटो लाऊून तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक मेसज ओपन करण्यापूर्वी तो तपासून पहा...
मुंबई: सध्या देशभरातील तरूणांईच्या मोबाईलवर भुवया उडवणारी आणि डोळ्यांच्या इशाऱ्याने तरूणाचा कलेजा खलास करणारी एक मुलगी प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुलीने अेकांच्या स्मार्टफोनमध्ये लिलया प्रवेश केला आहे. देश आणि विदेशातीलही अनेकांच्या हृदयावर राज करणाऱ्या या मुलीचे तुम्हीही फॅन झाला असाल तर सावधान..! या मुलीच्या नावे किंवा फोटो लाऊून तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक मेसज ओपन करण्यापूर्वी तो तपासून पहा...
प्रियाच्या नावाने 'टेक्स बॉम्ब'
आपण ज्या मुलीबाबत चर्चा करतो आहोत त्या मुलीचे नाव प्रिया प्रकाश असे आहे. आपल्या नजरेने अनेकांच्या काळजाच्या ठोका चुकवणाऱ्या प्रिया प्रकाशबाबत एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. प्रिया प्रकाशच्या नावाने दक्षिण भारतामध्ये एक व्हायरस सध्या धुमाकूळ घालत आहे. ज्याला 'टेक्स्ट बॉम्ब' नावाने ओळखले जाते. अनेकांचे स्मार्टफोन, कॉम्प्यूटर, लॅपटॉप अशा गोष्टी या व्हायरसने ग्रासल्याचे बोलले जात आहे. अनेकांचे आयफोन्सही क्रश झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रिया प्रकाशच्या नावाने येत असलेल्या कोणत्याही मेसेजची लिंक ओपन करण्यापूर्वी तो व्हायरस तर, नाही ना याची खात्री करून घ्या.
मेसेजच्या रूपात व्हायरसचा शिरकाव
दरम्यान, टेक्स युजर्सच्या आयफोनमध्ये हा व्हायरस मेसेजच्या माध्यमतून येत आहे. मेसेजबॉक्समध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करताच हा व्हायरस मोबाईलमध्ये शिरकाव करतो आणि स्मार्टफोन (आयफोन) क्रश करतो.
व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न
दरम्यान, प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, अॅपलने या वृत्ताबाबत प्रतिक्रीया दिली आहे, या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, जगभरातील अनेकांचे आयफोन क्रॅश करणाऱ्या या व्हायरसला फिक्स करण्याचे काम सुरू आहे. याचाच अर्थ असा की व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जास्तकरून अॅपलच्या ११.२.२ आयफोनला हा व्हायरस अधिक हानिकारक ठरताना दिसतो आहे. मात्र, जुन्या व्हर्जनवर या व्हायरसचा काहीही परिणाम होत नसल्याचेही वृत्त आहे. हा व्हायरस ज्या कोणत्या अॅपवर दिसतो तो त्या अॅपला हॅक करतो. सर्वात प्रथम इटलीतील एका वेबसाईटवर हा व्हायरस स्पॉट करण्यात आल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.