मुंबई : आपल्यापैकी बरेच असे लोक आहेत, जे नवीन मोबाईल घेतल्यानंतर आपला फोन सुरक्षित ठेवण्यासाठी टेम्पर्ड ग्लास आणि कवर लावतात. जे बाजारात वेगवेगळ्या किंमतीत आणि क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेट रेंजनुसार टेम्पर्ड ग्लास निवडू शकता. स्मार्टफोन पडल्यावर टेम्पर्ड ग्लास हा मोबाईलच्या डिस्प्लेला तुटण्यापासून वाचवते. अशावेळी जर आपला फोन पडला तर या टेम्पर्ड ग्लासला तडा जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु बऱ्याच वेळा असे घडते की, कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या स्मार्टफोनची टेम्पर्ड ग्लास कडांवरून फुटू लागते. असं असलं तरी अशी बरीच लोकं आहेत, जी ही ग्लास तुटली तरी देखील त्याला बदलत नाहीत. तुम्ही देखील असं करत असाल तर सावधान. कारण यामुळे तुम्ही तुमचंच नुकसान करताय.


जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार याबद्दल सविस्तर सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला ते कसं नुकसानकारक आहे, हे समजून घेण्यात मदत होईल.


डिस्प्ले खराब होऊ शकतो


जेव्हा स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरील टेम्पर्ड ग्लास कडांमधून क्रॅक होऊ लागतो, तेव्हा त्यातील काही तीक्ष्ण कडा बाहेर येतात, अशा परिस्थितीत जर तुम्ही स्मार्टफोनच्या डिस्प्लेला जोरात स्पर्श केला तर या टेम्पर्ड ग्लासमुळे मोबाईलच्या डिस्प्लेवर स्क्रॅच येतो. तसेच डिस्पले कधीकधी बरोबर काम करत नाही.


अशा परिस्थितीत, डिस्प्लेवर स्क्रॅच पडण्यापासून वाचवण्यासाठी, तुम्ही ही तुटलेली टेम्पर्ड ग्लास ताबडतोब काढून फेकून द्या आणि त्याच्या जागी चांगल्या दर्जाची टेम्पर्ड ग्लास लावा.


फोन पडल्यावर तो डिस्प्लेला वाचवू शकत नाही


एकदा का टेम्पर्ड ग्लास काठावरुन क्रॅक होऊ लागला की, मधल्या फोनच्या मधल्या भागावरील त्याची पकड कमकुवत होऊ लागते, त्यामुळे स्मार्टफोन तुमच्या हातातून पडला तर त्याचा डिस्प्ले तुटतो, कारण जेव्हा टेम्पर्ड ग्लासची पकड कमकुवत असते, तेव्हा तो डिस्प्लेला नीट संरक्षण देऊ शकत नाही.


अशा स्थितीत जर तुमच्या हातातून स्मार्टफोन जमिनीवर पडला तर त्याचा डिस्प्ले तुटतो. यामुळे टेम्पर्ड ग्लासच्या कडांना तडा जावू लागल्या की त्या बदलून घ्याव्या, नाहीतर शे-दोनशे रुपयांमुळे तुमचं हजाराचं नुकसान होऊ शकतं.