मुंबई : अमेरिकन मोबाईल एक्सेसरीज निर्माती कंपनी बेल्कीनने आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस, तसेच आयफोन एक्ससाठी एका नव्या तंत्रज्ञानावर आधारीत चार्जिग पॅड लॉन्च केलं आहे. कंपनीने आपल्या म्हटलं आहे, हे वायरलेस चार्जर आहे, याची किंमत ७ हजार रूपये आहे. हे चार्जर अमेझॉन, अॅप्पल रिसेलर्स यांच्याकडे ३० एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. बेल्कीनचे महाव्यवस्थापक आणि उपाध्यक्ष स्टीव मेलोनी म्हणाले, आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस, तसेच आयफोन एक्ससाठी 'बूस्ट अप' चार्जिग पॅडसोबत आम्ही युझर्सला, सर्वात चांगलं केबल फ्री आणि सुविधायुक्त चार्जिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही.


हे उपकरण ७.५ व्हॅटचे मोबाईल चार्ज करणार आहे. बेल्कीनने चार्जिंग करणे, तसेच या उत्पादनाचं डिझाईन करताना, युझर्सच्या गरजा यांची माहिती घेतली आहे, यासाठी बेल्कीनने जगभरातील युझर्सचा चार्जर वापरण्याचा अभ्यास केला होता.