Best Performance Hatchback In India: ऑफरोडिंगची आवड असणाऱ्या अनेकांच्याच विशलिस्टमध्ये काही अशा वाहनांची नोंद असते जी एकदातरी खरेदी करण्याची स्वप्न ही मंडळी पाहता. पण, वाहनांच्या किमती आणि त्यामुळं खिशाला बसणारा चटका मात्र सोसण्याजोगा नसल्यामुळं मग ही आवडही आवरती घेतली जाते. सरतेशेवटी एखाद्या पर्यायी आणि कमी ताकदीच्या वाहनांवर समाधान मानलं जातं. आता मात्र असं करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही ऑफरोडिंगसाठी अगदी सहज जाऊ शकणार आहात आणि तेसुद्धा तुम्हाला हवे ते फिचर्स असणाऱ्या वाहनानं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ऑफरोडिंग म्हटलं की काही कार कंपन्या आणि त्यांच्या मॉडेल्सना विशेष पसंती दिली जाते. महिंद्राची Thar ही त्यापैकीच एक. जिम्नीही या शर्यतीत मागं नाही. काय सांगता तुम्हीही थार खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय? आता ते स्वप्न साकार होणार आहे तेसुग्धा अवघ्या 6 लाख रुपयांमध्ये. 


6 लाखांमध्ये कमाल कार? 


आश्चर्याचा धक्का बसला ना? एक बाब लक्षात घ्या, इथं प्रत्यक्षात थार नाही पण, थार आणि जिम्नी यांच्यासारखेच फिचर असणारी एक कमालीची कार तुम्हाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे. ही कार आहे मारुती सुझूकीची स्टायलिश हॅचबॅक इग्निस. प्रिमीयम डिलरशनपनं विक्री केल्या जाणाऱ्या या कारची किंमत आहे, 5.84 लाख रुपये. या कारच्या टॉप मॉडेलसाठी तुम्ही 8.16 लाख रुपये मोजता. 


हेसुद्धा वाचा : सुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात आनंदी देश


काय आहेत या थारवजा कारचे फिचर्स? 


इग्निसचं नॅचरली अॅस्पिरेटेड 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन 83 बीएचपीहून जास्त पॉवर जनरेट करतं. तर, याच इंजिनमधून 113 एनएमचं पीक टॉर्क जनरेट होतं. कारमध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिग गिअरबॉक्सचा पर्यायही मिळतो. ही कार प्रती लिटर पेट्रोलमागे 20.89 किमी इतका मायलेज देते. ही कार हॅचबॅक असली तरीही तिचे फिचर्स मात्र एसयुव्हीसारखीच आहे. 



प्रोजेक्टर एलईडी, पुढील बाजूस चार वर्टीकल स्लॉट ग्रिल देण्यात आले आहेत. प्रिमयम आणि अपडेटेड इंटिरियर असणाऱ्या या कारची आसनक्षमता 5 व्यक्तींसाठी पुरेशी आहे. कारमध्ये तुम्हाला 7 इंचांचा टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम, स्मार्टप्ले स्टुडिओ फिचर, कार स्टिअरिंगमध्ये माऊंटेड कंट्रोल, नेक्सा सेफ्टी शिल्ड, ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडी, रियर डोर चाइल्ड लॉक, रियर पार्किंग कॅमेरा आणि आईसोफिक्स चाइल्ड सीट लॉक असे एकाहून एक सरस फिरर्स देत तिला थार किंवा जिम्नी भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला आहे. मग... तुम्ही कधी खरेदी करताय ही कार?